ram Panchayat Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा

रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील २४० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुका १८ डिसेंबरला होत आहेत. त्‍यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत.

टीम ॲग्रोवन

महाड : रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील २४० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुका (Gram Panchayat Election) १८ डिसेंबरला होत आहेत. त्‍यासाठी उमेदवारी अर्ज (Nomination For Gram Panchayat) दाखल करण्यात येत आहेत. निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्याने इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना शिंदे गटाची लढत होणार आहे. २४० ग्रामपंचायतींमध्ये महाड तालुक्यात सर्वाधिक ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

या शिवाय अलिबाग तालुक्यातील ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरूड ५, म्हसळा १३, रोहा ५, श्रीवर्धन १३, सुधागड १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

मुरूड : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी नुकतीच दिली.

९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २ डिसेंबरपर्यंत ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्‍याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT