Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : चाकण परिसरात केवळ २० टक्केच पेरण्या

Sowing : चाकण व परिसरातील गावात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या मात्र खोळंबल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : चाकण व परिसरातील गावात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या मात्र खोळंबल्या आहेत. चाकण व परिसरातील गावात केवळ २० टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

पेरणीसाठी पुरेशी ओल झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन चाकण मंडल कृषी अधिकारी गोविंद नाळे यांनी केले आहे. दरम्यान, उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकरी पेरण्या करत आहेत.

चाकण (ता. खेड) परिसरामध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या सध्या सुरू आहेत, परंतु आतापर्यंत फक्त २० टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. या पेरण्यामध्ये सोयाबीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन खालोखाल मका, वाल, उडीद, मूग आदींच्या पेरण्या शेतकरी करीत आहेत.

चाकण व परिसरामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची थोडीशी रिमझिम वाढली असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला. परंतु पाऊस पाहिजे तसा पडत नसल्यामुळे ओढे, नाले यांना पाणी आले नाही. तसेच शेतातही पाणी साचले नाही. तरीही शेतकरी थोड्याशा ओलीवर पेरण्या करीत असून, काही गावांमध्ये मशागतीला आणि पेरणीला वेग आला आहे.

चाकणच्या पश्‍चिम पट्ट्यातील काही गावांमध्ये भाताची रोपे टाकण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. पूर्व पट्ट्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. बहुतांश शेतकरी सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी असल्याने व सोयाबीनला योग्य भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन पीक घेण्याकडे वळले आहेत.

प्रगतिशील शेतकरी पंडित कोतवाल यांनी सांगितले, की बहुतांश शेतकरी बैलाने मशागती करताना दिसत नाहीत. परिसरात बैलांचे प्रमाण घटले आहे, त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेती केली जाते. यामध्ये नांगरणी, पेरणी ही ट्रॅक्टरने केली जाते. एका तासाला हजार ते बाराशे रुपये ट्रॅक्टरमालक घेतात. ट्रॅक्टरने पेरणी, मशागत लवकर होते, त्यामुळे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा मशागत व पेरणीसाठी वापर करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT