Animal Husbandry Department  Agrowon
ताज्या बातम्या

Animal Husbandry Department : पशुसंवर्धनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

पशुपालक, शेतकरी, तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

Team Agrowon

नगरः पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ११ जानेवारी, २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ असून AH.MAHABMS या अँड्रॉइड मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेही अर्ज सादर करता येणार आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाइप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक

बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

संपर्क साधा

अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ टोल फ्री क्रमांकावर अथवा, तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT