Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

आंबेगाव तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे.

Team Agrowon

महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव ः तालुक्यात परतीच्या पावसाने कांदा रोपांचे नुकसान (Onion Crop damage) झाले होते. त्यामुळे या वर्षी कांदा लागवड (Onion Cultivation) हंगाम लांबला होता. आता कांदा लागवड अंतिम टप्प्यात आला आहे. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रांत कांदा लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

आंबेगाव तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे.

तसेच गावांगावातील पाझर तलावातही चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले होते.

परंतु ढगाळ हवामान व धुक्यामुळे कांदा पिकावर करपा, भुरी, मुळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड थांबविली होती. पुन्हा कांदा लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली असून आता कांदा लागवड अंतिम टप्प्यात आला आहे.

जवळपास चार हजार २०३ हेक्टर क्षेत्रांत कांदा लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चार ते पाच टक्क्यांनी कांदा लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘ऑक्टोबर महिन्यापर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा सर्वाधिक फटका कांदा रोपांना बसला होता. तर शेतात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांना कांदा रोपे टाकता आली नाही. तसेच बदललेल्या वातावरणाचाही फटका बसला. त्यामुळे उशिराने कांदा लागवड करावी लागली,’ अशी माहिती शेतकरी नवनाथ काळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT