Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar Latest: पक्षबांधणीसाठी पवारांनी कसली कंबर

Team Agrowon

Mumbai News : आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची बूथ पातळीवर बांधणी करण्यासाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले असून अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंबर कसली आहे. पवार यांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबिरे घेण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी (ता. ४) झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पाटील म्हणाले, ‘‘पक्षांतर्गत तालुका, जिल्हा स्तरावर एक - दीड महिन्यात निवडणुका पूर्ण केल्या जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदा विभागीय स्तरावरील शिबिरे होतील.

आमचे नेते सर्व जिल्ह्यांचा दोन महिन्यात दौरा करतील. एप्रिल व मे महिन्यात ही शिबिरे घेण्यात येतील. याशिवाय महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत.

पहिली सभा संभाजीनगर येथे झाली. पुढची सभा नागपूरला होणार आहे. दरम्यानच्या काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सूचना देण्यात येणार आहेत.’’

'मुख्यमंत्र्यांना विरोधात बोललेले आवडत नाही’

ठाणे जिल्ह्यात पत्रकाराला धमकी आणि एका गर्भवती महिलेला केलेल्या मारहाणीवरून पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले ‘‘मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराला धमकावण्यात आले.

ही माहिती रोशनी शिंदे यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे या महिलेला मारहाण झाली,ती महिला गर्भवती आहे. महाराष्ट्रात असा हिंसाचार कधी झाला नाही. या सरकारला विरोधात बोललेले खपत नाही.’’

पोलिस कॉन्स्टेबलचा छळ

वैभव कदम या पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात जायला हवे, असेही ते म्हणाले. ‘‘त्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून टॉर्चर केले जात होते. जुन्या प्रकरणात दबाव आणला जात होता.

दबाव का आणला? मानसिक छळ का गेला? कारण जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक करता येईल यासाठी ठाणे पोलिस यामध्ये सहभागी झाले आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

‘मोदींच्या पदवीची चिकित्सा होणार’

मोदी हे बी.ए. आहेत म्हणून त्यांना देशाने पंतप्रधान केले असा भाग नाही. मोदींनी आपली पदवी आहे असे सांगितले असेल आणि प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची चिकित्सा होणार. त्यामुळे संबंधितांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे, असे पाटील म्हणाले.

‘अनिल बोंडेंना अवघड जाईल’

संभाजीनगरच्या दंगलीआधी स्कूटरवरून कोण फिरत होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले तर अनिल बोंडे यांना अवघड जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. सीसीटीव्ही तपासले तर ही लोकं आपल्या ओळखीची आहेत, हे कळेल.’

...तर फडणवीसांमध्ये दम

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असले तरी ठाण्यात ते शक्तीहीन आहेत. ठाण्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा २४ तासात ठाण्यातील एक तरी पोलिस अधिकारी बदलून राज्यात इतरत्र हलवून दाखवावा, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे, असे आम्ही मानू, असे आव्हान त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना मदत नाही

शेतकरी मदतीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘खानदेश, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आलो कुठेही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकार काही मदत करेल असे वाटत नाही. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले नाहीत.

सरकार कधी मदत करेल याची शेतकरी चातकासारखी वाट बघत आहेत. मात्र हे सरकार बिल्डर आणि उद्योगपतींचे आहे ते कधीच शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, कष्टकऱ्यांचे नाही आणि नव्हते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT