Nobel For Peace
Nobel For Peace Agrowon
ताज्या बातम्या

Nobel For Peace " मानवाधिकार कार्यकर्त्यासह युक्रेन-रशियन संघटनांना शांततेचे ‘नोबेल’

टीम ॲग्रोवन

स्टॉकहोम (वृत्तसंस्था) ः शांततेच्या नोबेल पुरस्कार (Nobel Award For Peace) २०२२ ची घोषणा शुक्रवारी (ता. ७) करण्यात आली. यंदा बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते (Human Rights Activist) एलेस बियालियात्स्की (Ales Bialiats) यांच्‍यासह रशियातील ‘मेमोरियल’ आणि युक्रेनच्या ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टिज’ या दोन मानविधाकार संस्थांना यंदाचे शांततेचे ‘नोबेल’ जाहीर झाले आहे.

मानवतावादी मूल्‍ये, सैन्यबळाचा दुरुपयोग आणि कायद्याची तत्त्वे यासाठी सातत्याने लढा देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा नोबेल पुरस्कार समितीने यंदा हा सन्मान दिला आहे. विविध देशांमध्ये शांतता आणि बंधुत्व नांदावे, असे अल्फ्रेड नोबेल यांना वाटत असे.

त्यांच्या नावाने दिला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्यांनी त्यांचा विचार पुनरुज्जीवित करून त्यांचा सन्मान केला आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. शांतता आणि लोकशाहीच्या स्थापनेसाठी नागरी जीवनावर भर देत विजेत्यांनी त्यांच्या त्यांच्या देशात जनतेच्या मूलभूत अधिकारांचा पुरस्कार करीत टीका करण्याचा अधिकारही बजावलेला आहे.

लोकशाही आंदोलनाचे प्रणेते

बेलारूसमधील मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बियालियात्स्की हे १९८० च्या दशकात लोकशाही आंदोलन सुरू करणाऱ्यापैकी एक आहेत. त्यांनी १९९६ मध्ये ‘विआस्ना’ या संघटनेची स्थापना केली आहे. राजनैतिक कैद्यांच्या छळाविरोधात आवाज उठविणे, देशात लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आणि शांततून विकास साधण्यासाठी बियालियात्स्की यांनी त्यांचे जीवन समर्पित केलेले आहे.

अत्याचाराविरोधात लढा

तत्कालीन सोव्हिएत महासंघातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी १९८७ मध्ये ‘मेमोरियल’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हाच्या कम्युनिस्ट सरकारमध्ये छळवणूक होणाऱ्या पीडितांची मदत करणे आणि चेचन्या युद्धातील अत्याचारांविरोधात जगभरात आवाज उठविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते.

मानवी हक्क, लोकशाहीला प्रोत्साहन

युक्रेनमधील नागरिकांना संघटित करणे, त्यांना पाठबळ देणे तसेच युक्रेनला पूर्ण लोकशाही बनवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे यासाठी देशात ‘द सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. मानवी हक्क आणि लोकशाहीला प्रोत्साहन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे.

रशियाने फेब्रुवारी २०२२मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर या संस्थेने रशियातील युद्ध गुन्हेगारांची ओळख पटविणे, त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे गोळा करणे आदी काम या संस्थेने केले आहे. युद्धातील दोषींना त्यांच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार धरण्यात ‘द सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’कडून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT