Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली होती. शरद पवार हे सैतान आहेत असा उल्लेख केला होता यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून खोत यांच्यावर रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. सातारा शासकीय विश्रामगृहात आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले की, शेतकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही सदाभाऊंकडे पाहात होतो; पण भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत. त्यांच्यात भाजपरूपी सैतान घुसला आहे. त्यामुळे ते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करायला लागलेत, असा पलटवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही कामगार चळवळीतील असून, सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहेत. आमचे त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत. चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. पण, भाजपमध्ये गेल्यानंतर ते बिघडले आहेत.
त्यांच्यात भाजपरूपी सैतान घुसला आहे. ते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करायला लागलेत हे दुर्दैव आहे. सध्या राज्यातील राजकारणाची पातळी संपली आहे. हे भविष्यासाठी धोकादायक आहे. आरोप, प्रत्यारोप, खालच्या पातळीवर करणे योग्य नाही.’
असेच सुरू राहिल्यास राजकारणाविषयी लोकांत तिटकारा निर्माण होईल. राष्ट्रवादीतील दुफळीचा पक्षावर परिणाम होणार का, या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, खासदार शरद यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील आम्ही दोघे, तिघेच राहिलो आहोत. आता पुन्हा एकदा पक्ष वाढविण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे फुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत
शरद पवार यांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केले. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला आहे.त्यामुळे शरद पवार गावगाड्याकडे पुन्हा आश्रयासाठी धावतं आहेत.
जैसी करणी वैसी भरणी कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागते. शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावे लागत आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये, अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.