Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Namo Shetkari Sanman Yojana : नमो शेतकरी सन्मानचे पैसे अडकले कुठे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे केली होती.

Team Agrowon

CM Eknath Shinde : राज्यसरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. हे पैसे पीएम किसानच्या १४ व्या हप्त्याबरोबर देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे केली होती.

मात्र केंद्राचा १४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला परंतु राज्य सरकार पैसे आलेच नाहीत. त्यामुळे नमो योजनेचे पैसे कधी मिळणार, याची कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात केवायसी पूर्ण झालेली नाही, असे जिल्ह्यात ४० हजार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांचेच लॉगिन आयडी उपलब्ध करून शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हफ्ता जमा झाला नाही त्या ४० हजारपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यामध्ये त्रुटी समोर आल्या आहेत. त्यातील काहीजण मृत तर काही इन्कम टॅक्सधारक आहेत. स्थलांतरित असून त्यांचा नवीन रहिवासी पत्ता नाही. यासंदर्भातील माहिती आता शासनाला कळविण्यात येणार आहे.

पी. एम. किसान सन्मान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे ५ लाखांवर शेतकरी पात्र ठरले होते. निकष लावल्यानंतर यातील शेतकरी कमी होऊन सध्या जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ७०० पात्र शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ४० हजार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या सहा हजार रकमेपैकी पहिला हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा होती; पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे नमो शेतकरी सन्मानचे पैसे शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार, याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT