Nagar APMC Agrowon
ताज्या बातम्या

Nagar APMC Result : नगर बाजार समितीत सत्तेसह प्रतिष्ठा राखली

नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांत किल्लेदारांनी गड राखले. महाविकास आघाडीला ७, भाजप व शिवसेना युतीला ३, तर अपक्षांना ४ बाजार समित्या मिळाल्या.

Team Agrowon

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा
Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या (Market Commttee) निवडणुकांत किल्लेदारांनी गड राखले. महाविकास आघाडीला ७, भाजप व शिवसेना युतीला ३, तर अपक्षांना ४ बाजार समित्या मिळाल्या.

दुसऱ्या टप्प्यातील निकालात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, (RadhaKrishna VikhePatil) आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकत बाजार समित्यांवर वर्चस्व सिद्ध केले. अकोले, पाथर्डी व श्रीगोंदे येथे सत्तांतर झाले.

अकोल्यात माजी मंत्री पिचडांना धक्का बसला. कोपरगावात काळे, कोल्हे आणि परजणेची युतीला यश मिळाले.

नगर जिल्ह्यात शुक्रवारी सात व रविवारी (ता. ३०) सात बाजार समित्यांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील निकालात पारनेर, राहुरी, श्रीगोंदे, संगमनेर या तालुक्यांतील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले होते.

तसेच भाजप-शिवसेनेच्या युतीने नगर तालुका, पाथर्डी येथे विजय मिळविला. कर्जतमध्ये मात्र समसमान जागा मिळाल्या. दुसऱ्या टप्प्यात रविवारी (ता. ३०) लागलेल्या निकालांत महाविकास आघाडीला शेवगाव, अकोले, नेवासे येथे वर्चस्व राखता आले.

भाजप व शिवसेना युतीने राहात्यावर वर्चस्व मिळविले. श्रीरामपूर, व कोपरगावमध्ये स्थानिक आघाड्यांनी जास्त जागा पटकाविल्या. तर जामखेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

राहात्यात भाजपचे नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, शेवगावात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेलने तर नेवासे तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकल्या.

कोपरगाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्त्वाखाली काळे, कोल्हे, परजणे यांची अनोखी युती पहायला मिळाली. या युतीने सर्व १८ जागा जिंकल्या. अकोले तालुक्यात महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या.

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या गटाला ७ जागांवर समाधान माणून सत्ता गमवावी लागली. श्रीरामपूर येथे डॉ. सुजय विखे पाटील, करण ससाणे गट, माजी आमदार भानुदास मुरकुटे गट सरस ठरला. त्यांनी १७ जागा जिंकल्या.

जामखेडला आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांना प्रत्येक ९ जागा मिळाल्या. कर्जतलाही दोन्ही गटाला समान ९ जागा मिळाल्या आहेत.

बाजार समित्याच्या निवडणुकांतून सत्तेसह प्रतिष्ठा जिंकल्याचे नेते सांगत आहे. आता सभापती, उपसभापती पदाकडे लक्ष लागले आहे.

जेथे काठावर बहूमत आहे किंवा समान जागा आहेत तेथे उमेदवार पळवापळवीचे प्रकार, आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

...अशी आली सत्ता
एकून बाजार समित्या १४
महाविकास आघाडी ७
भाजप व शिवसेना ३
अपक्ष (संमिश्र) ४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT