Nagar Apmc Election : नगर जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज

नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी म्हणजे चौदा बाजार समित्यांच्या २९४ जागांसाठी २४६१ अर्ज दाखल झाले आहेत.
Nagar Apmc Election
Nagar Apmc ElectionAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी (Market Committee Election) सोमवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी म्हणजे चौदा बाजार समित्यांच्या २९४ जागांसाठी २४६१ अर्ज दाखल झाले आहेत. समित्यांवर सत्ता मिळवण्यासाठी त्या त्या तालुक्यातील नेत्यांचाही आटापिटा सुरू झाला आहे.

नगर जिल्ह्यातील नगर तालुका, संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहाता, नेवासे, शेवगाव, अकोले व कोपरगाव या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत.

उमेदवारी अर्जांची छाननी पाच तारखेस होणार आहे. दुसऱ्या दिवशी यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ६ ते २० एप्रिलदरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे या काळात अर्ज मागे घेण्याबाबत मनधरणी करण्यासाठी नेत्यांची दमछाक होणार आहे.

Nagar Apmc Election
Akola Apmc Election Update : अकोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा पाऊस

२८ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने जिल्हाभर राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. बाजार समितीच्या क्षेत्रात राहणारे १५ शेतकरी हे त्या बाजार समितीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृषी पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत.

१५ शेतकऱ्यांपैकी ११ शेतकरी हे सहकारी संस्थेचा मतदारसंघ व चार शेतकरी हे ग्रामपंचायतीच्या मतदार संघातून निवडले जाणार आहेत. सहकारी संस्थेच्या मतदार संघात महिला प्रवर्गासाठी दोन, इतर मागास प्रवर्गासाठी एक आणि विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे.

तसेच ग्रामपंचायती मतदार संघात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही अर्ज दाखल करता येतात. अर्ज संख्येतही वाढ झाली असून, अपक्षांचे अर्ज वाढले आहेत.

Nagar Apmc Election
Dhule Apmc Election Update : धुळ्यात बाजार समित्यांची रणधुमाळी

बाजार समितीनिहाय अर्ज

नगर तालुका - २२८

संगमनेर - १०९

राहुरी - २२९

पारनेर - १६१

श्रीगोंदे - २८१

पाथर्डी - १६०

कर्जत - २४०

जामखेड - १९८

श्रीरामपूर - १४९

राहाता - १२७

नेवासे - ११७

शेवगाव- १९२

अकोले - १५९

कोपरगाव- १११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com