Heavy Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rainfall : मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७६३९ मिमी पावसाची नोंद

हवामान विभागाने चालू वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. एक जूनपासून ते एक नोव्हेबर अशा पाच महिन्यांच्या कालावधीत मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार ६३९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

- यंदा जवळपास सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पावसाची नोंद

- चार महिने धो-धो पाऊस

- मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात वेगाने वाढ

पुणे : हवामान विभागाने चालू वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज (Rain Prediction) वर्तविला होता. एक जूनपासून ते एक नोव्हेबर अशा पाच महिन्यांच्या कालावधीत मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार ६३९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी पाच महिन्याच्या कालावधीत ६ हजार ४६४ मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी एक हजार १५५ मिलिमीटरने अधिक पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस पडला होता; मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल सात हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडला होता.

इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याची चांगलीच आवक झाली. त्यामुळे यंदा पावसाळ्यात धरणांत तब्बल ६३२.६० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी एकूण असलेल्या २६ धरणांत २०२.६७ टीएमसी एवढ्या उपयुक्त पाण्याचा साठा करण्यात आला असून उर्वरित पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

चालू वर्षी पुणे जिल्ह्यात उशिराने जोरदार पाऊस झाला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. त्यातच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला. त्यातच परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून थंडीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील धरणांत पाण्याची आवक कमी होत असल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी चार महिन्यांच्या काळात मुळशीच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर ६ हजार ४४० मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यापाठोपाठ टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ५५४ मिलिमीटर पाऊस पडला.

तर गेल्या वर्षी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ४३ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर खडकवासला, शेटफळ, नाझरे, वीर, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस :

यंदा झालेल्या पावसामुळे लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर चार हजार ८४० मिलिमीटर पाऊस पडला. तर वळवण ४ हजार ७४ मिमी, ठोकरवाडी ३ हजार १००, शिरोटा २ हजार ३७१ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षी याच घाटमाथ्यावर कमी पाऊस पडला होता. यामध्ये लोणावळा ४ हजार ४३३ मिमी, वळवण ३५९८, ठोकरवाडी २ हजार ७०३, शिरोटा २ हजार २२० मिमी पाऊस पडला होता.

चालू वर्षी १ जून ते १ नोव्हेबर या पाच महिन्यांत धरणनिहाय पडलेला पाऊस (मिमीमध्ये) :

धरण --- चालू वर्षी पडलेला पाऊस -- गेल्या वर्षी पडलेला पाऊस

टेमघर -- ३५५४ -- ३०४३

वरसगाव -- २६४४ -- २०२३

पानशेत -- २६४४ -- २०४७

खडकवासला -- ९३७ -- ७०१

पवना --- २७३७ -- २६२०

कासारसाई -- १२५५-- ९४२

कळमोडी -- १८५८ -- १३४२

चासकमान -- १०६४ -- ६५९

भामा आसखेड -- १२८१ -- १००२

आंध्रा -- १६७६ -- १२९२

वडीवळे -- २८२० -- २७२२

शेटफळ -- ८७४ -- ६५१

नाझरे -- ९६९ -- ३६१

गुंजवणी -- २६३९ -- १८५९

भाटघर -- ११२१ -- ७९८

निरा देवघर -- २४१३ -- २४१९

वीर -- ८६४ -- ४६७

पिंपळगाव जोगे -- १३२९ -- ८३५

माणिकडोह -- १५४० -- ९०४

येडगाव -- १४३० -- ६६२

वडज -- १०१३ -- ५७६

डिंभे -- १४९७ -- १०१३

चिल्हेवाडी -- १०३६ -- ४९५

घोड -- ५६५ -- ५६१

विसापूर -- ३९४ -- २५८

उजनी -- ८०४ -- ५३९

मुळशी -- ७६३९ -- ६४८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT