Sugar Mills Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mills: बहुतांश कारखान्यांकडून साखर उतारा प्रमाणपत्रे सादर

उतारा प्रमाणपत्र जारी होताच लगेच एफआरपी (FRP)द्यावी लागते व ती न दिल्यास साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी चक्क प्रमाणपत्र उशिरा घेण्याची भूमिका काही साखर कारखाने घेत होते.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणेः गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यातील काही साखर कारखान्यांनी (Sugar Mills) अंतिम साखर घट उतारा प्रमाणपत्रे सादर केली नव्हती. त्यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikavad) यांनी ही समस्या निकाली काढण्यासाठी राज्यभर आढावा बैठका लावल्या. त्यामुळे आता बहुतेक कारखान्यांनी प्रमाणपत्रे सादर केली आहेत.

साखर कारखान्यांनी केंद्राच्या रास्त व किफायतशीर दराप्रमाणे (एफआरपी) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देयके देणे बंधनकारक आहे. ऊस दर नेमका कसा अदा करायचा, याचे सुधारित धोरण राज्य शासनाने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी निश्‍चित केले आहे. त्यानुसार हंगाम समाप्त होताच संबंधित कारखान्याने १५ दिवसांच्या आत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) साखर उतारा निश्‍चित करून घ्यायचा आहे. मात्र अनेक कारखान्यांनी उतारा निश्‍चित करून घेण्यात दिरंगाई केली होती.

साखर कारखान्यांना मिळालेला प्रत्यक्ष साखर उतारा तसेच इथेनॉलनिर्मितीसाठी (Ethanol Production) उसाचा रस, पाक व बी हेवी मळीच्या वापरामुळे किंवा विक्रीमुळे साखर उतारा नेमका किती घटला आहे, याची माहिती एकत्रितपणे काढावी.

तसेच उताऱ्यातील घट पकडून अंतिम साखर उतारा निश्चित करताच त्याप्रमाणे एफआरपी काढून ती तत्काळ अदा करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्तालयाने दिले होते. मात्र उतारा प्रमाणपत्र जारी होताच लगेच एफआरपी (FRP) द्यावी लागते व ती न दिल्यास साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी चक्क प्रमाणपत्र उशिरा घेण्याची भूमिका काही साखर कारखाने घेत होते.

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, २०२१-२२ मधील गाळप हंगामात २०० साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यापैकी ९५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) ऊस रस, पाक व बी हेव्ही मळीचा वापर केलेला आहे. परंतु पहिल्या टप्प्यात फक्त ५० कारखान्यांनी ‘व्हीएसआय’कडून साखर उतारा प्रमाणपत्रे घेतली.

“जवळपास ४५ साखर कारखान्यांनी मुदतीत प्रमाणपत्रे घेतली नव्हती. त्यामुळे साखर आयुक्तांनी गंभीर दखल घेत राज्यभर आढावा बैठका सुरू केल्या. कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना विशेष लेखापरीक्षकांच्या बैठकांना हजर राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बहुतेक कारखान्यांनी प्रमाणपत्रे घेतली,” अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

आयुक्तालय कारखान्यांना काय विचारतेय?

तोडणी-वाहतुकीचा खर्च निश्‍चित करण्याची व साखर घट उतारा प्रमाणपत्रानुसार शेतकऱ्यांना अंतिम एफआरपी देण्याची जबाबदारी कारखान्यांची आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याने तोडणी व वाहतुकीचा खर्च निश्‍चित केला आहे का? साखर उतारा निश्‍चित केला आहे का? साखर उताऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) दिली का? या तीन प्रश्‍नांबाबत साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना सातत्याने विचारणा केली जात आहे.

राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी जितकी साखर वळवली असेल; त्याप्रमाणात ती उताऱ्यात उताऱ्यात गृहीत धरली जाईल. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने एफआरपी काढून ती शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT