Khandesh Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain : जळगावात अधिक, तर नंदुरबारात कमी पाऊस

Khandesh Rain Update : वाफसा नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

Team Agrowon

Khandesh Monsoon Update : जळगाव ः खानदेशात ६ जुलैनंतर अनेक भागांत सतत पाऊस सुरू आहे. यातच मागील काही दिवसांत पावसाने विश्रांतीच घेतलेली नसल्याने वाफसा तयार होण्यास अडथळा येत आहे. पाऊसमान चांगले असून, जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ४२ टक्के आणि नंदुरबारात सुमारे ३६ टक्के पाऊस झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ६३२ मिलिमीटर, धुळ्यात ५३५ मिलिमीटर आणि नंदुरबारात ८६० मिलिमीटर पाऊस पडतो. या एकूण पावसाच्या सरासरीच्या ४२ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. तर, धुळ्यात ३९ टक्के आणि नंदुरबार जिल्ह्यात ३६ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबारमधील पाऊसमान शहादा व नंदुरबारमधील काही भागातील कमी पावसाने कमी दिसत आहे. शहादा तालुक्यातील पूर्व भागात कमी पाऊस आहे. नंदुरबारातही दक्षिण व पूर्व भागात कमी पाऊस आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यातील सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यात ८० टक्के आणि नंदुरबारातही ८० टक्क्यांवर पाऊस आहे.

जूनमध्ये सरासरीच्या पाच टक्केही पाऊस झाला नव्हता. परंतु या महिन्यात पावसाने मोठी तूट भरून काढली आहे. पुढील पाच ते सहा दिवस पाऊस

झाल्यास जूनमधील संपूर्ण तूट पाऊस भरून काढेल, असेही चित्र आहे. ६ जुलै ते २४ जुलै यादरम्यान सतत पाऊस सुरू आहे. फक्त मध्यंतरी तीन दिवस

पाऊस नव्हता किंवा ढगाळ वातावरण होते. पाऊस

सुरूच असल्याने वाफसा स्थिती होत नसल्याची स्थिती आहे. काळ्या कसदार जमिनीत पूर्वहंगामी कापूस पिकात पाण्याचा निचरा होत नसल्याने पीक पिवळे, लाल होत आहे. यामुळेपावसाने काही दिवस उघडीप दिली पाहिजे, असे शेतकऱ्यांचे किंवा कापूस उत्पादकांचे म्हणणे आहे.

फवारणीनंतर पाऊस

रविवारी (ता.२३) व सोमवारी (ता.२४) दिवसभर ढगाळ वातावरण होते. वाराही अधूनमधून येत होता. उघडीप लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तणनाशके व कीडनाशक आदींची फवारणी हाती घेतली. परंतु सायंकाळी पाचनंतर पाऊस आल्याने फवारणी वाया गेली. सध्या तणनाशकांचा उपयोग सोयाबीन व कापूस पिकात वाढला आहे. मजूरटंचाई आहे. त्यात पाऊस येतच असल्याने तणनाशकांशिवाय पर्याय नाही, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत. सतत ढगाळ वातावरण असल्याने कापूस व भाजीपाला पिकांवर रोगराई येत आहे. याचा परिणाम उत्पादनावर निश्चितच होईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT