Agricultural Technology Management Agrowon
ताज्या बातम्या

Modern Agriculture : आधुनिक पद्धतीच्या शेतीतून अधिक नफा

अकोट तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने तालुक्यातील उमरा गावात शेतकरी संवाद व चर्चासत्र घेण्यात आले.

Team Agrowon

अकोला ः अकोट तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agricultural Technology Management) यंत्रणेच्या (आत्मा) वतीने तालुक्यातील उमरा गावात शेतकरी संवाद व चर्चासत्र घेण्यात आले. आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, आत्मा प्रकल्प संचालक आरिफ शहा व तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी देविदास रंधे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषज्ञ प्रा. कुलदीप देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा नीलेशकुमार नेमाडे, कृषी सहायक संकेत पाटील होते.

रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांचे संपूर्ण लागवड तंत्रज्ञानाविषयी प्रा. देशमुख यांनी माहिती दिली. हरभरा व गहू पिकांच्या नव्याने प्रसारित झालेल्या प्रमुख जाती, बियाणे संवर्धन बीजप्रक्रिया, पिकावर येणाऱ्या प्रमुख कीड व रोगांची ओळख, त्याचे व्यवस्थापन, पाणी व तण व्यवस्थापन, खते व सुक्ष्म मूलद्रव्ये व्यवस्थापन आदी माहिती दिली.

श्री. नेमाडे यांनी शेतकऱ्यांना शेती करीत असताना विद्यापीठ व कृषी संशोधन संस्थांच्या तांत्रिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पन्नात हमखास भर पडून नफ्याचे प्रमाण वाढवता येते, असे सांगितले. संकेत पाटील पाटील यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT