Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाड्यात थंडी अधिक

राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता अधिक असल्याने थंडी अधिक राहण्याचे संकेत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट होऊ लागल्याने थंडीची (Cold) चाहूल लागली आहे. जानेवारी महिन्यात विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता अधिक असल्याने थंडी (Cold Weather) अधिक राहण्याचे संकेत आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीइतके राहण्याचा, तर कोकणात थंडी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

जानेवारी महिन्यातील किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी (ता. ३१) जाहीर केला. त्यानुसार जानेवारी महिन्यात मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतातील भाग आणि वायव्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची शक्यता आहे. तर दक्षिण भारत, ईशान्य भारतातील राज्यात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यात पश्चिम किनारपट्टीवर पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मात्र दक्षिण भारतासह पश्चिम किनारपट्टी व लगतच्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

यात गुजरातसह महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती मार्चअखेरपर्यंत कायम राहणार आहे. ला-निना स्थिती त्यानंतर निवळत जाण्याचे संकेत आहेत. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update : मॉन्सूनची राजस्थानच्या काही भागातून माघार; राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज 

Farmer Support: शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत द्या; भारत कृषक समाजाची केंद्र, राज्य शासनाकडे मागणी

Nanded Drought Meeting: दुष्काळी आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्यावरून विरोधक आक्रमक

Rain Update: परळी, अंबाजोगाई तालुक्यांतील पाच मंडलांत अतिवृष्टी

Digital Agriculture: कीड-रोग व्यवस्थापनासाठी डिजिटल तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT