Cold Weather : राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

महाराष्ट्रावर सध्या १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब असून ते बुधवार (ता. ४) पासून १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. हवेचे दाब वाढतात तेव्हा तापमान कमी होते.
cold weather
cold weather

महाराष्ट्रावर सध्या १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब (Air Pressure) असून ते बुधवार (ता. ४) पासून १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. हवेचे दाब वाढतात तेव्हा तापमान (Temperature) कमी होते. आणि तिथून पुढे थंडीचे (Cold Weather) प्रमाण वाढत जाईल. पश्‍चिम भारताच्या लगत हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०२० ते १०२२ हेप्टापास्कल इतका वाढेल. त्यामुळे वायव्येकडून येणारे थंड वारे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात येतील.

त्यामुळे त्या भागातही धुके आणि थंडीचे प्रमाण वाढेल. उत्तर-पश्‍चिम भारतावर सकाळच्या वेळी धुक्याची दाटी सकाळी तर उत्तर भारतात हिमालयातील भागात बर्फवृष्टी सुरू होईल. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. बंगालच्या उपसागराचे पाण्याचे तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. यामुळे बाष्पीभवनात अधिक वाढ होऊन महाराष्ट्रामध्ये हवामान ढगाळ राहील.

कमाल व किमान तापमानात मोठी घट अपेक्षित नाही. मात्र किमान तापमानात अल्पशी घट अपेक्षित आहे. त्यामुळेच थंडीचे प्रमाण वाढण्यास बुधवार (ता.४) नंतर सुरुवात होईल. महाराष्ट्रातील दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मात्र सोलापूर व लातूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि सांगली जिल्ह्यात पूर्वेकडून राहील.

कोकण

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. मात्र पालघर जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६० ते ६६ टक्के तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४५ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.

cold weather
Cold Weather : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा

कमाल तापमान जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड व हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात विभागवार कमाल तापमानात फरक जाणवेल. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील.

cold weather
Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ५० टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४३ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३० टक्के तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २७ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात नागपूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५४ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४४ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १९ ते २५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ५० ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २९ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा सोलापूर जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला

उन्हाळी बाजरी, तीळ, सोयाबीन व भुईमूग बागायत क्षेत्र पिकांच्या पेरण्या जमिनी ओलावून वाफसा येताच कराव्यात.

 आंबा मोहराचे तुडतुड्यापासून संरक्षण करावे.

ओंबी तयार होण्याच्या अवस्थेतील रब्बी ज्वारी पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करावे.

थंडीचे प्रमाण अधिक असल्यास सकाळी आणि रात्री उशिरा मत्स्यसंवर्धन तलावामध्ये देण्यात येणारे खाद्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी द्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com