Monsoon Rain Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Rain : माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु !

राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी झाला. मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसानं पुन्हा हजेरी लावली. तर बऱ्याच मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी झाला. मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसानं (Heavy Rainfall) पुन्हा हजेरी लावली. तर बऱ्याच मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. माॅन्सूननं आज देशाच्या आणखी काही भागातून माघार घेतली. तर हवामान विभागानं (Weather Forecast Department) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

माॅन्सूनने आज देशाच्या आणखी काही भागातून काढता पाय घेतला. माॅन्सूनने आज विदर्भ आणि छत्तीसगडचा काही भाग तसचं ओडिशाच्या अनेक भागातून माघार घेतली. तर झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुराचा उर्वरित भाग आणि संपूर्ण मोझाराम, मनिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेशमधून माॅन्सून माघारी फिरलाय. तर पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून, तसचं छत्तीसगडचा उर्वरित भाग, ओडिशा, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरच्या मध्य भागातून माॅन्सून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.

आज राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रागयड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मध्यम सरी झाल्या. तर काही मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा अधिक होता. नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर तुरळक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

मराठवाड्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोर होता. विदर्भात पावसाचा जोर ओसरल्याची स्थिती होती. विदर्भातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप होती.

दरम्यान, हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT