Monsoon
Monsoon Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक

Team Agrowon

राज्यात काही ठिकाणी पावसाचा (Rain) जोर वाढला होता. मात्र मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली. तर हवामान विभागानं (IMD) उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांत विजांसह (Rain With Thunder) जोरदार पावसाचा अंदाज जारी केलाय. 

कोकणातील अनेकभागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.

रायगड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये काही काळ जोरदार पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. 

मध्य महाराष्ट्रातही पावसाची अनेक भागांमध्ये रिपरिप झाली. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. कोल्हापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

तर सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. तर बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. 

विदर्भातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक होता. मात्र जोरदार पाऊस पडल्याची ठिकाणं अत्यंत कमी होती. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज जारी केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT