Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अकोला, वाशीममध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

Latest Rain Update : गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना काही भागांत दिलासा मिळाला.

Team Agrowon

Akola News : गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना काही भागांत दिलासा मिळाला. मंगळवारी (ता. ५) रात्री काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मंगळवारी (ता. ५) सायंकाळी अनेक भागांत पावसाचे वातावरण तयार झाले होते. रात्री उशिरा पावसाचे आगमन झाले.

अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस नोंद झाली. वाशीम जिल्ह्यातही अशाच स्वरूपातील पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यात मात्र जळगाव, संग्रामपूर व नांदुरा या तीन तालुक्यांत काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित जिल्हा अद्यापही कोरडाच आहे.

अकोला जिल्ह्यात मंगळवारी (ता.५) मुंडगाव मंडलात ६.५ मिलिमीटर, तेल्हारा १३.३, माळेगाव बाजार १३.३, हिवरखेड ९.५, अडगाव बुद्रुक ३.५, पंचगव्हाण १३.३, पातूर १५.५, अकोला १०, दहीहांडा २०.५, बोरगाव मंजू १६, शिवणी ४.५, बार्शीटाकळी १२.५, महान २६, राजंदा ५.८, धाबा २६, पिंजर १२.८, खेर्डा बुद्रुक १२.८, मूर्तिजापूर २०.५, हदगाव २३.५, माना २३.८, शेलू बाजार २१.५, लाखपुरी ३१.३ आणि जामठी २३. ३ पाऊस नोंद झाली.

वाशीम जिल्ह्यात पार्डी टकमोर १६.३, अनसिंग १५.८, वारला ११.८, पार्डी आसारे १५.८, किन्हीराजा १७.३, आसेगाव १३.२, पोटी २१.८, पार्डी तड १२.२, धानोरा १०.३, कवठळ १३.३, मानोरा ७.५, इंझोरी १६.५, कुपटा १३.३, शेंदुरजा ११.५, गिरोली १०.३ पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर,जळगाव जामोद तालुक्यांत अल्प प्रमाणात शिडकावा झाला.

सोयाबीनचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

या भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात काही मंडलांमध्ये त्रोटक स्वरूपात पाऊस पडला. तेव्हापासून दररोज पावसाचा खंड वाढत चालला आहे.

यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची भीती वाढली आहे. आता पाऊस आला तरी उत्पादनाची तूट कमी होणार नसल्याचे कृषी जाणकार सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT