Deepak Kesarkar agrowon
ताज्या बातम्या

Deepak Kesarkar : मी साईचरणी प्रार्थना केली अन् कोल्हापूरचा महापूर ठळला, मंत्री दिपक केसरकरांचा अजब दावा

Kolhapur Flood : कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर नाशिक दौऱ्यावर होते. तेथे पत्रकार परिषदेत त्यांनी महापुराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.

Team Agrowon

Kolhapur News : देवाकडे प्रार्थना केल्याने कोल्हापूरला पूर आला नाही. या अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा. एक फुटानेही पाणी पातळी वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे... असा अजब दावा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.

मंत्री केसरकर हे नुकतेच नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.

यावेळी केसरकर म्हणाले, ``पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की साधारणतः पाच फुटांपर्यंत पाण्याच्या पातळी वाढते; पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो. मी साईचरणी हे संकट टळू दे अशी एकच प्रार्थना केली. त्यामुळे पाणी पातळी वाढली नाही. तसेच संभाव्य धोकाही टळला.`` पालकमंत्र्यांच्या या अजब दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, `` पाटबंधारेकडे चौकशी केली, तर ५-६ फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती. निसर्गात पण देव आहे. प्रार्थनेत ताकद आहे, अध्यात्म महत्त्वाचे आहे.`` महाराष्ट्राचा दौरा करत असताना शिर्डीमार्गे नाशिकला जाण्याचे निश्चित झाले होते, असे त्यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले की, कोल्हापुरात पूरपरिस्थिती येते की काय, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, योगायोगाने मी शिर्डीला उतरलो. साईबाबांचे दर्शन घेतले. साईचरणी साकडे घातले आणि त्याच दिवशी पूर परिस्थिती कमी झाली.

पाऊस उघडल्याने राधानगरी धरणाचे दरवाजेही बंद झाले. पावसाचा जोर कायम राहिला असता तर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असती, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांचे मिश्किल उत्तर

दरम्यान दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली. केसरकरांनी नाशिकला यावे, देवाचा धावा करावा आणि आमची धरणे भरावी. अशी मागणी करावी; त्यामुळे आम्हाला आनंदच होईल, असा चिमटा भुजबळांनी केसरकरांना काढला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coromandel International: ग्रामविकासाला कोरामंडलच्या ‘ग्रोमोर ग्राम’ची जोड

Ahilyanagar Sugarcane Price Protest: अहिल्यानगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

OTS Scheme Update: परभणी जिल्ह्यात ४७५९ शेतकरी ‘ओटीएस’मध्ये

Rabi Jowar Sowing: ज्वारी पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल

Agricultural Land: सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का नाही! पण 'त्या' पडीक शेतजमिनी ३ वर्षांत पिकाखाली आणा- बावनकुळे

SCROLL FOR NEXT