Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढू लागला आहे. उद्यापासून मध्य प्रदेश आणि वायव्य भारताच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांची घट होण्याचे संकेत आहेत.

टीम ॲग्रोवन

Pune Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा (Cold Weather) वाढू लागला आहे. उद्यापासून मध्य प्रदेश आणि वायव्य भारताच्या किमान तापमानात (Minimum Temperature) सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांची घट होण्याचे संकेत आहेत. परिणामी राज्यातही किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. काही भागात पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती आहे. राज्यात सध्या किमान तापमान १२ ते २५ अंशांच्या दरम्यान आहे. पहाटे गारठा असून, धुके, दव दिसून येत आहे. कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. आज (ता. १५) राज्यात कोरड्या हवामान व आकाश निरभ्र राहून, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उपसागरात उद्या कमी दाब क्षेत्राचे संकेत

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकल्यानंतर निवळून गेले आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ, तामिळनाडू, कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात उद्या (ता. १६) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.४ (१३.९), जळगाव ३५.८ (१६.३), धुळे ३०.० (१३.०), कोल्हापूर ३१.८ (२१.१), महाबळेश्वर २७.१(१६.०), नाशिक २८.७ (१५.१), निफाड ३०.५ (१२.५), सांगली ३२.६(१९.१), सातारा ३१.१(१६.४), सोलापूर ३४.३ (१९.४), सांताक्रूझ ३४.८(२१.२), डहाणू ३४.८ (२१.१), रत्नागिरी ३५.८ (२४.३), औरंगाबाद २९.४ (१२.८),

नांदेड ३३.२ (१६.८), उस्मानाबाद - (१९.०), परभणी ३०.५ (१५.०), अकोला ३२.० (१७.०), अमरावती ३१.० (१४.८), बुलढाणा २९.५ (१५.५), ब्रह्मपूरी ३२.२ (१५.४), चंद्रपूर २९.६ (१६.४), गडचिरोली ३१.४(१५.२), गोंदिया २९.५(१३.६), नागपूर ३०.४ (१३.०), वर्धा - (३०.४), वाशीम ३२.४ (१७.०), यवतमाळ ३०.५ (१३.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT