Micro Irrigation
Micro Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Micro Irrigation : सूक्ष्म सिंचन प्रणाली लाभदायक ठरेल

Team Agrowon

Agriculture Irrigation सासवड, जि. पुणे : ‘‘पुरंदर तालुक्यात सरासरी कमी पाऊस (Rainfall) आहे. त्यासाठी तलाव, बंधारे, ओढे-नाले खोलीकरण, शेततळी (Farm Pond), बांधबंदिस्ती करून पावसाच्या पाण्याचे पाणी अधिकाधिक जिरवणे व संचय करण्याचा उपाय गावशिवारात झाला पाहिजे. जेणेकरून भूजलाच्या पाण्याचा (Ground Water) कार्यक्षम वापर करण्याची सवय शेतकऱ्यांनी लावलीच पाहिजे.

त्यातही सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकपणे अवलंब करावा. त्यातून ६५ टक्के पाण्याची बचत होईल,’’ असे प्रतिपादन पुणे (गणेशखिंड) येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे नवनियुक्त सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड यांनी येथे केले.

दिवे-जाधववाडी (ता.पुरंदर) येथे अखिल भारतीय समन्वित अंजीर, सीताफळ संशोधन केंद्रावर शेतकरी -शास्त्रज्ञ मंचाच्या कार्यशाळेचे व मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन नुकतेच केले होते.

या वेळी उद्यान अधीक्षक प्रा.एन. बी. शेख, शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष देवराम काळे, संशोधन केंद्र प्रमुख डॉ. प्रदीप दळवे, केंद्रातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे आदी उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या सदस्यांना व शेतकऱ्यांना विद्यापीठ दिनदर्शिका तसेच अंजीर आणि सीताफळ लागवड तंत्रज्ञान पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

प्रश्न उत्तराच्या सत्रात शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी देवराम काळे, मंचाचे सदस्य दिलीप जाधव, निवृत्त कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, मंगेश लवांडे, महेश खटाटे, सुनील जाधव, सचिन जाधव, बापू शेलार, नितीन इंगळे, सतीश काळे, शंकर शेंडकर, विजय कोंढाळकर, कल्याण जगताप, वैभव गोगावले, भाऊसाहेब झेंडे व जगदीश पांढरे आदींनी विविध प्रश्न विचारले. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा हा उपक्रम व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील नाळे, नितीश घोडके, संदीप लिंभोरे, अनंता झेंडे यांनी परिश्रम घेतले.

पाणथळ व चोपण जमिनी भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब केल्यास या जमिनी लागवडीखाली आणता येतील. हिरवळीचे पीक लावून ती फुलोरा पिके जमिनीत गाडली गेल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, तसेच मातीतील सूक्ष्म जिवाणू हालचाली वाढून जमिनीला हवा खेळती राहून जमिनीची सुपीकता वाढते व मुळांना ऑक्सिजन मिळतो.

-डॉ. प्रदीप दळवे, संशोधन केंद्रप्रमुख, अंजीर-सीताफळ संशोधन केंद्र, दिवे-जाधववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT