Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

MahaDBT : ‘महाडीबीटी’वर सोडत होणार नाही, हा संदेश चुकीचा आहे

Maharashtra Agriculture Department : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणाऱ्या ‘महाडीबीटी’वरील अर्जाची १५ मे नंतर सोडत होणार नाही, असा मेसेज गेल्या आठ दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar Agri News : कृषी विभागाच्या विविध योजनांचा (Agriculture Scheme) लाभ दिला जाणाऱ्या ‘महाडीबीटी’वरील (MahaDBT) अर्जाची १५ मे नंतर सोडत होणार नाही, असा मेसेज गेल्या आठ दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरत आहे. मात्र हा संदेश खोटा आणि खोडसाळपणाने प्रसारित केला जात आहे.

असा कोणताही आदेश आयुक्तालय अथवा शासन स्तरावरून देण्यात आलेला नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतीविषयक साहित्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज नोंदणी सुरू ठेवावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतीसाठी लागणाऱ्या विविध शेती अवजारांचा तसेच शेततळे व अन्य विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘महाडीबीटी’ हे पोर्टल विकसित केलेले आहे. एकाच अर्जात विविध योजनांचा लाभ देण्याची सुविधा शासनाने या पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.

साधारण अर्जाची संख्या बऱ्यापैकी झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत सोडत काढून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. सोडतीमध्ये शेतकऱ्याचे नाव स्पष्ट झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला थेट मेसेज पाठवून आपण लाभार्थी असल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणे सोपे झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून महाडीबीटीवर योजनांच्या लाभासाठी तातडीने अर्ज करावेत, कारण १५ मे पासून कुठल्याही पद्धतीची सोडत होणार नाही, असे मेसेज समाज माध्यमावर फिरत आहेत. या मेसेजमुळे शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र कृषी आयुक्तालय अथवा राज्य शासनाकडून असे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे हे संदेश खोडसाळपणाने टाकले जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. अशा चुकीच्या व खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज करणे सुरू ठेवावे, असे आवाहनही कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या अर्जाचा विचार करून आठ ते पंधरा दिवसाला सोडत काढली जाते. सोडत होणार नाही, अशा संदर्भात कसलाही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. शेतकऱ्यांनी लाभ घेण्‍यासाठी अर्ज करणे सुरू ठेवावे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management : सुदूर संवेदन माहितीसाठ्याचा प्रत्यक्ष उपयोग

Rajarambapu Sugar Factory : राजारामबापू साखर कारखान्याचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत, प्रदूषण मंडळाकडून नोटीस

Bribe News : सिंचन विहिरीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहायकाला अटक

Pumpkin Seed : भोपळा बियांचे आरोग्यदायी फायदे

Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

SCROLL FOR NEXT