Land Acquisition Agrowon
ताज्या बातम्या

Land Acquisition : सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याचा तिढा सुटणार

सोलापुरातून जाणारया सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला अत्यंत तोकडा आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुरातून जाणारया सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला अत्यंत तोकडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे.

त्यावर तोडग्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे आणि लवकरच या विषयावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सुरत-चेन्नई महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात आहे. प्रामुख्याने बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याची झळ बसणार आहे. या तीन तालुक्यातील ९७ गावातील शेतकऱ्यांची जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. आतापर्यंत या महामार्गाची संपूर्ण मोजणी पूर्ण झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने रेडीरेकनरनुसार जिरायती शेतीसाठी प्रतिएकर तीन लाख, चार लाख आणि पाच लाख रुपये तर बागायती शेतीसाठी सात लाखाचा दर काढला आहे. मात्र, शेतकऱ्यांना तो मान्य नाही.

बाजारातील शेतीचे मूल्य आणि सरकारने ठरवलेले मूल्य यात मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. याच विषयावर शेतकऱ्यांनी मोर्चा, रास्ता-रोको यासारखी आंदोलनेही केली आहेत.

त्यानंतर पालकमंत्री विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार दोनच दिवसापूर्वी मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील रस्ते प्रकल्पासंबंधी आढावा बैठक झाली.

त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी हा प्रश्न तिघांच्याही कानावर घेतला. तेव्हा यावर सर्व संबंधितांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्याचे सांगण्यात आले.

...तर पुन्हा आंदोलन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. पण आमच्या मागणीनुसार निर्णय न झाल्यास एकही शेतकरी या महामार्गाला जमिनी देणार नाही. तसेच पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT