KVK Agrowon
ताज्या बातम्या

KVK : ‘केव्हीके’त शास्त्रीय सल्लागार समितीची सभा

विविध उपक्रमांचा आढावा व सूचना देण्याकरीता कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा सभा घेण्यात आली.

टीम ॲग्रोवन

वाशीम ः (Washim) वर्षभर शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित व कौशल्याभिमुख शेतकरी प्रशिक्षण तसेच राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा व सूचना देण्याकरीता कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची (KVK) सभा सभा घेण्यात आली.

आगामी रब्बी हंगामाला अनुसरून झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त चैतन्यभैया देशमुख होते. तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिफारसीत तंत्रज्ञान अनुकरण करून शेतीतील खर्चात कपात व अधिक नफा घ्यावा तसेच शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी, असे सांगितले.

सभेच्या तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, टी. एस. देशमुख, एन. बी. पाटील, आर.एस.डवरे, एस. के. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले, शुभांगी वाटाणे, एस. आर. बावस्कर

व प्रमोद देशमुख यांनी कार्यक्रमांचा प्रगती अहवाल सादर केला. कार्यक्रमादम्यान वायगाव हळदीचे अधिक उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी योगेश खानझोडे यांचा सत्कार घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Crop Damage: धाराशिव जिल्ह्यात ८५ टक्के पिकांचे नुकसान

Staffing Structure Cancellation: ‘कृषी’चा आकृतिबंध रद्दचा प्रस्ताव पुढील आठवड्यात

Sugar Sale Quota: साखर कोटा दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३.५० लाख टन

Sugar Mills Soft Loan Scheme: साखर कारखान्यांसाठी ७३८ कोटींचे सॉफ्ट लोन

Bharit Brinjal Market: जळगावच्या भरीत वांग्यांची आवक सुरू

SCROLL FOR NEXT