Nashik DCC Bank  Agrowon
ताज्या बातम्या

Nashik DCC Bank : ‘जिल्हा बँकेची वसुली थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करा’

Nashik DCC Bank News : यासंदर्भात जिल्‍हा प्रशासनामार्फत शनिवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्‍यासह इतरांना निवेदन देण्यात आले.

Team Agrowon

Nashik News : जिल्‍हा बँकेची सक्‍तीची वसुली थांबवावी व राज्‍य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्‍हा प्रशासनामार्फत शनिवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्‍यासह इतरांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्‍हटले आहे, की १ जूनला गोदावरी नदीवर रामतीर्थावर कर्जाच्‍या नोटिसा बुडवून, प्रशासनाला निवेदन देऊन गोल्‍फ क्‍लब मैदानावर धरणे आंदोलन, उपोषण सुरू केले आहे. ३८ दिवस उलटूनही दाखल न घेतल्‍याने येत्‍या २० जुलैपासून शेतकरी अन्न त्‍याग आंदोलन सुरू करणार आहोत.

तत्‍पूर्वी मागण्यांचा विचार होताना त्‍या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून केलेली आहे. दरम्‍यान शनिवारी (ता. १५) शासन आपल्‍या दारी उपक्रम जिल्ह्यात आयोजित केलेले असताना, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देत व आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविला.

आंदोलनकर्त्यांच्‍या शिष्टमंडळाने प्रशासनाला भेट देताना निवेदनाची प्रत सुपूर्द केली. शेतकरी संघर्ष संघटना जिल्‍हा अध्यक्ष सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, दत्तात्रेय सुडके, देवा वाघे, अनंत पाटील, नंदकुमार देवरे आदींच्‍या स्‍वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT