Mahindra Tractor Agrowon
ताज्या बातम्या

Mahindra Tractor : महिंद्राचे आधुनिक, हलक्या वजनाचे सात ‘ओजेए’ ट्रॅक्टर्स बाजारात सादर

OJA Tractors : महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्स या जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने भविष्याचा वेध घेणाऱ्या ट्रॅक्टरची महिंद्रा ओजेए (ओजा) ही श्रेणी बाजारात सादर केली आहे.

Team Agrowon

Oja Tractor Lightweight Market : केपटाऊन ः महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्स या जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने भविष्याचा वेध घेणाऱ्या ट्रॅक्टरची महिंद्रा ओजेए (ओजा) ही श्रेणी बाजारात सादर केली आहे. त्याचे सादरीकरण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे मंगळवार (ता. १५) रोजी आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये करण्यात आले.

केपटाऊनमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये OJA तीन प्लॅटफॉर्म अंतर्गत सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी अशा प्रकारामध्ये नवीन ट्रॅक्टर सादर केले. भारतीय बाजारपेठेसाठी 4WD सह, महिंद्राने कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी प्लॅटफॉर्मवर २० एचपी - ४० एचपी (१४.९१ kW – २९.८२ kW) क्षमतेचे ७ नवीन ट्रॅक्टर सादर केले आहेत.

भारतातून सुरुवात केल्यानंतर ही श्रेणी पुढे उत्तर अमेरिका, आसियान, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि सार्क देशांमध्ये आणण्यात येईल. २०२४ मध्ये थायलंडमध्ये त्याचे सादरीकरण करून आसियान प्रदेशातही पदार्पण करण्याचे नियोजन केले आहे.

नवीन ओजा ट्रॅक्टरच्या सादरीकरणावेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा चे फार्म इक्विपमेंट सेक्टर चे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, की हलक्या वजनाच्या ट्रॅक्टरची नवीन ओजेए श्रेणी ही प्रगतिशील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर पॉवरहाऊस ठरेल.

हे नवे ट्रॅक्टर्स महिंद्राला जागतिक ट्रॅक्टर उद्योगातील २५% हिस्सा मिळवून देण्यासाठी व युरोप आणि आसियान सारख्या नवीन बाजारपेठा उघडून देणारे ठरतील. भारतामध्येही चपळ, हलक्या वजनाचे अत्याधुनिक असे 4WD ट्रॅक्टर्सचे एकूण सात मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात येत आहे. हे ट्रॅक्टर कृषी क्रांती घडविण्यातील आमची वचनबद्धता सिद्ध करतील.

भारतातील OJA श्रेणीबद्दल माहिती देताना कंपनीच्या फार्म डिव्हिजनचे सीईओ विक्रम वाघ म्हणाले, की ही ट्रॅक्टर श्रेणी भारतीय शेतीमध्ये बदल घडवून आणेल. कारण त्यात 4WD क्षमतांसह स्वयंचलन नियंत्रण उपलब्ध केली असून, त्यामुळे ऑपरेटरचे श्रम वाचून अचूकता आणि कार्यक्षमता वाढवतात.

फळबागामध्ये विशेषतः द्राक्ष शेतीमध्ये वेगाने काम करण्याची क्षमता आहे. त्याच्या तीन प्रगत ट्रॅक्टर श्रेणी MYOJA (इंटेलिजन्स पॅक), PROJA (उत्पादकता पॅक) आणि ROBOJA (ऑटोमेशन पॅक) मधील सात मॉडेल्स शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील. या OJA श्रेणीतील ट्रॅक्टरची निर्मिती तेलंगण येथील झहीराबादमध्ये करण्यात येणार असून, ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. त्याच्या किमती रु. ५ लाख ६४ हजार ५०० पासून पुढे ताकद आणि वैशिष्ट्यानुसार वेगवेगळ्या आहेत.

अत्याधुनिक ट्रॅक्टरची श्रेणी
महिंद्रांने OJA या श्रेणीमध्ये जगातील हलके, ऊर्जावान आणि एखाद्या कारप्रमाणे शेतामधील कामांचा अनुभव देणारे ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. ओजा हा शब्द ‘ओजस’ या संस्कृत शब्दापासून घेतला असून, त्याचा अर्थ ‘ऊर्जेने परिपूर्ण’ असा होतो. या ट्रॅक्टरचा विकास ‘महिंद्रा रिसर्च व्हॅली’ तील भारतीय अभियांत्रिकी संघ आणि जपान येथील मित्सुबिशी महिंद्रा कृषी मशिनरीचे संशोधन आणि विकास केंद्र येथे संयुक्तरित्या करण्यात आला आहे. लाइट वेट ट्रॅक्टर 4WD साठी अत्याधुनिक डिझाईन आणि अभियांत्रिकी, ट्रॅक्टर तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी १२०० कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT