Memorandam of Collaboration Agrowon
ताज्या बातम्या

‘माफसू’ आणि इस्राईलच्या पर्यटन खात्यात करार

इंडो-इस्राईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिणामकारकता वाढविणे असा या कराराचा उद्देश आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूरः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि इस्राईलच्या पर्यटन खात्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. इंडो-इस्राईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिणामकारकता वाढविणे असा या कराराचा उद्देश आहे.

इस्राईलच्या पर्यटन खात्याचे भारतीय पर्यटन संचालक सामी याहिया आणि विद्यापीठाचे कुलसचिव सचिन कलंत्रे यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी विद्यापीठाने महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालय आणि इस्राईलच्या पर्यटन खात्याचे इंडो-इस्राईलच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक कार्यक्रमांना चालना देण्याकरिता घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार मानले. इंडो-इस्राईल विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक कार्यक्रमांना चालना देणे, शिक्षणाची परिणामत्कता वाढविणे, उद्योजकतेबाबत जागरूकता तसेच संशोधन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असा उद्देश या सामंजस्य कराराचा आहे.

या वेळी कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर, गोवर्धन इकोविलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्करना यांचित, ‘माफसू’चे कार्यकारी परिषद सदस्य तापेश्‍वर वैद्य, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ. सुनील सहातपूरे, अधिष्ठाता (मत्स्य विज्ञान) डॉ. एस. डब्ल्यू. बोंडे, नियंत्रक (वित्त व लेखा) शुभांगी धुर्वे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. महेश जावळे यांनी केले. प्रज्ञेय ताकसांडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy Projects: शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ओढा सौरऊर्जा प्रकल्पांकडे

Goras Bhandar FDA Action: ‘गोरस भंडार’वरील कारवाईवर उच्च न्यायालयाचे प्रश्‍नचिन्ह

Agricultural Schemes Funding: कृषी योजनांपेक्षा कर्मचाऱ्यांवर जादा खर्च

Agriculture Department Cadre:‘कृषी’च्या आकृतिबंधात विशिष्ट संवर्गासाठी हवे तसे बदल

Seed Multiplication Centres: तालुका बीजगुणन केंद्रे वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT