Honey Production Agrowon
ताज्या बातम्या

Madh Kendra Yojana : ग्रामोद्योग मंडळातर्फे मध केंद्र योजना

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे यांनी केले.

टीम ॲग्रोवन

धुळे ः राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (Madh Kendra Yojana) (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे यांनी केले.

अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ, संस्था व्यक्ती प्रशिक्षणासाठी पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण, वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.

अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी, लाभार्थ्याकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था प्रशिक्षणासाठी पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वार घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरसफूट सुयोग्य इमारत असावी, संस्थेकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

योजनेची वैशिष्ट्ये...

मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाश्या संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.

अटी व शर्ती : लाभार्थी निवडप्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासाठी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जमनागिरी रोड, धुळे, दूरध्वनी : ०२५६२-२४६२९२ येथे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT