Buldana News : जिल्ह्यात लम्पी स्कीनची लागण झालेले जनावर मूर्तीजापूरमध्ये आढळले आहे. आणखी काही ठिकाणी प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणाला वेग दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख १७ हजार ६७० जनावरांना लसीकरण केले असून एकूण जनावर संख्येच्या ९३.३१ टक्के लक्ष्यांक गाठल्या गेला आहे.
जिल्ह्यात दोन लाख ३३ हजारांवर जनावरे आहेत. यापैकी २ लाख २२ हजार ७२४ जनावरांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. यात अकोल्यात ४५ हजार ३००, अकोट ३६५१२, बाळापूर २७८९१, बार्शीटाकळी ३१८१५, पातूर २४१०३, मूर्तीजापूर २९७०३, तेल्हारा २६४०० जनावरांचे लसीकरण झाले. एकूण दोन लाख १७ हजार ६७० जनावरांना लस दिली गेली आहे. यामध्ये बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात १०० जनावरांचे लसीकरण आटोपले आहे.
जिल्ह्यात वर्षभरापूर्वी लम्पी स्कीन या त्वचा आजाराने सर्वधूर थैमान घातले होते. प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे बाधित झाली होती. जनावरांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर लसीकरणाचे सत्र राबवण्यात आले. यंदा पुन्हा लम्पी स्कीनने डोकेवर काढणे सुरू केले.
मूर्तीजापूर तालुक्यात पठाणपुरा भागात पहिली नोंद झाली आहे. इतरही ठिकाणचे काही नमुने तपासणीला पाठवण्यात आलेले आहे. प्रादुर्भाव आढळलेल्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतर भागात तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरणही करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.