Lumpy Disease Maharashtra agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Disease Maharashtra : लम्पीचे थैमान, अधिकारी फोन उचलत नाहीत, मृत पशुधनांची आकडेवारी समोर

sandeep Shirguppe

Lumpy Skin Disease : मागच्या काही महिन्यांपासून लम्पी आजाराने राज्यातील हजारो जनावरांचा बळी घेतला आहे. दरम्यान मागच्या ५ महिन्यात जवळपास साडेचार हजार जनावरांचा मृत्यू झाला. राज्यात लम्पी रोगाने सर्वाधिक बळी कोल्हापूर व मराठवाड्यात गेले आहेत. 'लम्पी'मुळे मृत्यू पावलेल्या पशुधनांमध्ये वासरांसह गायींचा सर्वाधिक समावेश आहे.

दरम्यान लम्पी रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील कोल्हापूर, पुणे, अहमदनगर जळगावसह काही जिल्ह्यातील बैल बाजार बंद करण्यात आले आहेत. राज्यात यंदा १ एप्रिल ते १ सप्टेंबरदरम्यान ५२ हजार १४९ जनावरे संक्रमित झाली तर ४४०६ गायी आणि बैलांचा मृत्यू झाला.

दरम्यान राज्यात बहुतेक ठिकाणी लसीकरणाची मोहिम सुरू आहे. परंतु लम्पीचा प्रादुर्भाव वाढता असल्याने पशुपालकांमध्ये चिता व्यक्त केली जात आहे. परराज्यातून येणाऱ्या जनावरांमुळे जास्त प्रमाणात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

जिल्हानिहाय जनावरांचा बळी

राज्यात सर्वाधीक लम्पीने कोल्हापूर जिल्ह्यात पशुधनांचा मृत्यू झाला. कोल्हापूर- ६९०, नांदेड- ५५७, सोलापूर- ५५१, परभणी- ५२२, बीड -३७७, लातूर -३६२, सांगली- २७७, अहमदनगर- १८५, हिंगोली- १४०, जळगाव- १४४, सिधुदुर्ग- ८०, नागपूर- ७९, छ. संभाजीनगर- ७३, धाराशीव ७९, चंद्रपूर- ५४, जालना -५१, पुणे -५१, नाशिक- ४२, वर्धा- २७, रत्नागिरी- २४, सातारा- १६, वाशिम- १३, नंदुरबार- १०, धुळे- ०५, अमरावती- ०३, भंडारा ०२, रायगड- ०१, अकोला -०२, बुलढाणा -०१.

अशी मिळणार मदत

राज्य सरकारकडून लम्पीने दगावलेल्या जनावरांना ३० हजार रुपये गाय तर प्रति बैल २५ हजार रुपये, वासरासाठी १६ हजार रुपयांप्रमाणे पशुपालकांना अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. याबाबत जिल्हापरिषद सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे.

लम्पीने सर्वाधिक मृत्यू वासरांचा झाला मागच्या पाच महिन्यात १,७७५ वासरे, १५१९ गायी आणि १११२ बैलांचा मृत्यू झाला आहे. परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे तर कोल्हापूरमध्ये ३९३ गायीचा आणि नांदेडमध्ये २९२ बैलांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्हयात सर्वाधीक लम्पी ग्रस्त पशुंची संख्या असल्याने कोल्हापूर पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. जिल्ह्याील करवीर, राधानगरी, गारगोटी, कागल, यासह जिल्ह्यातील अनेक गावांत लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT