NCP Rasta Roko Agrowon
ताज्या बातम्या

Import Policy : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका ः पाटील

देशात कापूस दरामध्ये सातत्याने घट होत असताना ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी, अर्थात ५१ हजार टन कापूस आयात करणार आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः देशात कापूस दरामध्ये (Cotton Rate) सातत्याने घट होत असताना ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी, अर्थात ५१ हजार टन कापूस आयात (Cotton Import) करणार आहे. केंद्र सरकारच्या मार्फत कापूस आयात होणार असल्याने देशातील कापसाचे भाव कमी होतील.

याचा शेतकऱ्यांवर परिणाम होईल. तुरीच्या आयातीलाही वर्षभराची मुदतवाढ दिल्याने दर पडतील. केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांनी केले.

जळगाव जामोद येथे ३१ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या वेळी पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘सरकारच्या आयात धोरणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर प्रचंड परिणाम होईल.

कापूस आयातीसोबतच तुरीच्या खुल्या बाजारातील आयातीला सुद्धा १ वर्षाची मुदतवाढ केंद्राने दिली. जिनिंग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी, निर्यातदार यांच्या दबावाखाली येत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण स्वीकारले आहे.’’ आंदोलकांनी केंद्र सरकार व केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात नारेबाजी करीत निदर्शने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT