Lumpy Skin  Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy skin : वडगाव जनावरे बाजार बंद असल्याने नुकसान

वडगाव बाजार समितीतील जनावरांचा बाजार लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे तीन महिने बंद आहे.

Team Agrowon

पेठवडगाव, जि. कोल्हापूर : वडगाव बाजार समितीतील जनावरांचा बाजार (Livestock Market) लम्पी स्कीनच्या (Lumpy skin Outbreak) प्रादुर्भावामुळे तीन महिने बंद आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तर यावर विसंबून असणारे अनेक व्यावसायिकांचे हाल होत आहेत. बाजार बंदचा वडगाव बाजारपेठेच्या उलाढालीवरही परिणाम झाला आहे.

अनेक वर्षांपासून वडगाव शहराची ओळख बैलांच्या बाजारामुळे पुढे आली आहे. बाजारास महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा यासारख्या अन्य राज्यांतून जनावरे खरेदीसाठी येतात. परंतु लम्पी स्कीनमुळे हा बाजार तीन महिने ठप्प झाला आहे. जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा आजार पसरत असल्यामुळे शासनाने या बाजारावर बंदी घातली. त्याचे परिणाम अन्य विविध घटकांवर होत आहेत.

वडगाव बाजारासाठी रविवारपासून टेम्पोतून जनावरे विक्रीसाठी येतात. यानंतर प्रत्येक सोमवारी पहाटेपासून बाजारास सुरुवात होते. शेळ्या, मेंढ्या, बकरी यांचा व्यापार पहाटेपासून सुरू होतो. तो दहा वाजता बंद होतो. त्यानंतर बैल, म्हशी, गाईंचा व्यापार सुरू होतो. या व्यापारासाठी हजारो शेतकरी, व्यापारी, दलाल, विविध विक्रेते जमतात. यामुळे बाजारपेठेत उलाढाल मोठी होते. बाजार समितीचा दोन ठिकाणी बाजार आहे. यामध्ये वडगावसह इचलकरंजी येथे मोठा बाजार भरतो. त्यामुळे या दोन्ही शहराच्या उलाढालीवर त्याचा परिणाम होत आहे.

बाजारातून बाजार समितीस महिन्याला सहा लाखांचा कर मिळतो. याप्रमाणे तीन महिन्यांत अठरा लाखांचे नुकसान झाले. या उत्पन्नाचा विचार केला तर महिन्यास कर्मचाऱ्यांचे वेतन साडेसहा लाखांच्या आसपास आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही बाजार समितीला अवघड झाले आहे.

वडगाव बाजार समिती आवारात पंधरा लहान-मोठी हॉटेल, चहागाडे आहेत, कोल्डड्रिंक विक्रीचे गाडे आठ ते दहा, पानटपरी, शेती अवजारे विक्रीची पंधरा दुकाने याशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, बेपारी, दलाल, शेतकरी मोठ्या संख्येने येतात. जनावरांची ने आण करणारे टेम्पो व्यावसायिक यावर विसंबून आहेत. यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. या दिवशी वडगाव शहरात आठवडा बाजार असतो.

या बाजारासाठी येणारे व्यापारी गावातील बाजारात खरेदी करतात. सध्या तो बाजार बंद असल्याचा परिणाम या बाजाराच्या कोट्यावधीच्या उलाढालीवर होत आहे. सध्या शासनाने लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण मोहीम करून आजाराचा संसर्ग आटोक्यात आणला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा बाजार सुरू करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Speaker Controversy: विधानसभा अध्यक्षांचे वर्तन घटनाबाह्य

Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध

APMC Investigation Report: बाजार समिती चौकशी अहवाल मोघम, त्रोटक

Land Record Reform: खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्शाची होणार नोंद

Cotton Farmer Issue: स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

SCROLL FOR NEXT