Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Akola Rain Update : अकोल्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस

Rain News : जून महिना शेवटच्या आठवड्यात पोहोचला तरी पावसाचा पत्ता नाही. शुक्रवारी (ता.२३) रात्री हलक्या स्वरूपाच्या काही काळ सरी आल्या.

Team Agrowon

Akola News : जून महिना शेवटच्या आठवड्यात पोहोचला तरी पावसाचा पत्ता नाही. शुक्रवारी (ता.२३) रात्री हलक्या स्वरूपाच्या काही काळ सरी आल्या. त्यानंतर शनिवारी (ता.२४) पुन्हा वातावरण उघडले. जिल्ह्यातील शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करीत थांबलेला आहे.

एकीकडे मॉन्सूनचा पाऊस पूर्व विदर्भापर्यंत पोहोचला असताना पश्‍चिम विदर्भात अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत मात्र अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. तीनही जिल्ह्यांत उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्‍यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी अकोला व वाशीम जिल्ह्यांत काही भागांत रिमझिम पाऊस झाला. अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण राहणार असले, तरी दमदार पावसाला सुरुवात मात्र २६ जूननंतर होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात शनिवारपासून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्यात सायंकाळी काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. अकोला शहरातही रिझमिझ पाऊस सुरू झाला. मात्र पेरणी योग्य दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

...अशी आहे १ ते २२ जूनपर्यंतची स्थिती

अकोला ः प्रत्यक्षात पाऊस ः ६.५ मिमी (तूट ९३ टक्के)

बुलडाणा ः प्रत्यक्षात पाऊस ः ९.२ मिमी (तूट ८९ टक्के)

वाशीम ः प्रत्यक्षात पाऊस ः २०.८ मिमी (तूट ८१ टक्के)

सध्याचे तापमान

अकोला ः ३९.२

बुलडाणा ः ३६.८

वाशीम ः ३७.६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT