Farming Agrowon
ताज्या बातम्या

Parbhani Rain News : परभणी जिल्ह्यातील १३ मंडलात १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस

Monsoon Rain Update : यंदाचा (२०२३) पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी अद्याप परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या ७ तालुक्यातील १३ मंडलात १०० मिलिमीटर देखील पाऊस झालेला नाही.

Team Agrowon

Parbhani Rain News : यंदाचा (२०२३) पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी अद्याप परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या ७ तालुक्यातील १३ मंडलात १०० मिलिमीटर देखील पाऊस झालेला नाही. परिणामी जमीन कोरडी आहे.

पुरेशा ओलाव्याअभावी खरिपाची पेरणी रखडली इतरही अनेक मंडलातही अपुऱ्या ओलाव्यामुळे उगवण व्यवस्थित होत नाही. दुबार पेरणी करावी लागत आहे.असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यावर्षीच्या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. १७) पर्यंत एकूण १०० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये दूधगाव ६६.४, वाघी धानोरा ७२.७, कावलगाव ७३.७, चुडावा ७४, झरी ७८.५, रामपुरी ८१.८, पिंपळदरी ८२.८, जिंतूर ८४.८, बामणी ८७.९, सेलू ९१.६, आडगाव ९३.२, बनवस ९७.२, दैठणा ९८.९ मिलिमीटर या १३ मंडळाचा समावेश आहे. याशिवाय उर्वरित ३९ मंडलात आजवर अपेक्षित सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही.

पेरणीसाठी किमान १०० मिलिमीटर पाऊस आवश्यक आहे. यंदाच्या जून महिन्यात पावसाची तूट निर्माण झाली. त्यानंतरही सर्व मंडलांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकसारखे नाही. सर्वदूर पेरणी नाही. बांधावर गवत वाढले नाही. उगवण झालेल्या पिकाची हरिण, निलगाय, रानडुक्कर आदी प्राण्यांकडून नासाडी होत आहे. पेरण्यास उशीर झाल्यामुळे उत्पादकतेत घट येऊ शकते.

दरम्यान, परभणी हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलात सोमवारी (ता. १७) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळात अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.४ मिलिमीटर, जुलै महिन्यात एकूण सरासरी ७५.३ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी १३०.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलात अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५.१ मिमी, जुलै महिन्यात आजवर एकूण १११.७ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी १५६.८ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यत एकही मंडलात आजवर अपेक्षित सरासरीएवढा पाऊस झाला नाही.

आमच्यासह परिसरातील अनेक गावांच्या शिवारात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जमीन कोरडीच आहे. त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी राहिली आहे.
- दीपक ढोकर, पिंपरी (रो.) ता. जिंतूर, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT