Poultry Feed
Poultry Feed  Agrowon
ताज्या बातम्या

Poultry : पोल्ट्रीची जाळी तोडून २०० कोंबड्या केल्या फस्त

टीम ॲग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत (Leaopard Terror) तालुक्यात वाढत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रकार वाढतच असून कासारवाडी परिसरात अचानक रविवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या कासारवाडी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्री (Poultry) फार्ममध्ये घुसला.

बिबट्याने एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करत २०० कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली. एकीकडे रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. तर बिबट्याकडून परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडत असताना आता बिबट्याने थेट पोल्ट्रीमध्ये शिरून कोंबड्यांवरच ताव मारला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने कुक्कुटपालक भयभीत झाले आहेत.

कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांची ५ हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यःस्थितीत कोंबड्यांचे वजन दीड किलोच्या आसपास आहे. रविवारी (ता. २७) रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला व दिसेल त्या कोंबड्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. कोंबड्याही भेदरून सैरावैरा पळू लागल्या. बिबट्याने यात अनेक कोंबड्या फस्त करत तेथून पळ काढला.

कोंबड्याचा आवाज ऐकून शेजारीच राहत असलेले देशमुख यांनी बघितले असता अनेक कोंबड्या मृत झाल्याचे त्यांचे लक्षात आले. यात जवळपास २०० कोंबड्या मृत पावल्या आहेत. सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती देत तत्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. वन विभागाचे आकाश रूपवते यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Cultivation : इतके अनर्थ केवळ अतिमशागतीने केले

Kolhapur Agriculture Work : वळवाच्या पावसाने शेतीकामांना गती, खरिपासाठी शेतकऱ्यांची धांदल

Use of Pesticides : नियामक यंत्रणा सुधारण्याची संधी

Onion Nursery : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Mango Orchard : आंबा बागायतदारांना पावसाचा फटका

SCROLL FOR NEXT