Amba Mohar  Agrowon
ताज्या बातम्या

Mango Season : यंदा रसायनी परिसरात उशिराने आंब्याला मोहोर

लांबलेला पावसाळा, उशिरा पडलेली थंडी, थंडी सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस पडलेले धुके अशा अधूनमधूनच्या खराब हवामानाच्या परिणामामुळे आंब्याला उशिरा मोहोर आला आहे.

Team Agrowon

Mango Season रसायनी : रसायनी परिसरात यंदाच्या वर्षी खराब हवामानाचा फटका (Bad Weather)आंब्याच्या पिकाला (Mango Crop) बसला आहे. सध्या अनेक झाडांना मोहोर (Mango Blossom) येऊ लागला आहे. यापूर्वी थोडा फार मोहोर आलेल्या आंब्याच्या काही झाडांनाही पुन्हा मोहोर येऊ लागला आहे.

सध्याचे अनुकूल वातारणात (Weather) असल्याने मोहोर चांगला येत आहे, असे मंगेश देसाई आणि इतर शेतकर्!यांनी सांगितले. काही दिवसांपासून आंब्याला मोहोर येऊ लागल्याने शेतकर्!यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

परिसरात शेतकर्!यांच्या शेताच्या बांधावर रायवळ, कलमी आंब्याची झाडे अंगणात किंवा परसदारी दिसत आहेत.

लांबलेला पावसाळा, उशिरा पडलेली थंडी, थंडी सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस पडलेले धुके अशा अधूनमधूनच्या खराब हवामानाच्या परिणामामुळे आंब्याला उशिरा मोहोर आला आहे.

बागेतील आंब्याच्या झाडांप्रमाणे रायवाळ आंब्याच्या झाडांना खत, पाणी, औषध फवारणी कोणी करत नाही; मात्र तरी आंब्याला चांगला मोहोर येत आहे. महाशिवरात्रीपर्यंत आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याचा कालावधी असल्याचे कृषीमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: ५ दुधाळ जनावरे, शेड, उपकरणांसह ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; काय आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना?

Maha DBT Scheme: वणीत शेतकरी अडचणीत; शेकडो अर्ज प्रलंबित

Livestock in Rain: गारपीट आणि वादळी पावसात जनावरांची काळजी कशी घ्यावी?

Farm Road Issue: ‘त्या’ शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या

Urea Production: सध्याची परिस्थिती अत्यंत अडचणीची, देशांतर्गत युरिया उत्पादनावर परिणाम

SCROLL FOR NEXT