Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Water Bill Recovery : कृष्णा खोरे विकास महामंडळ यंदा पाणीपट्टी वसुलीत अव्वल

सिंचन विभाग वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असतो. यंदा मात्र तो बिगर सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीत विक्रमी झेप घेतल्याच्या कारणावरून चर्चेत आला आहे.

Team Agrowon

Pune Irrigation News : सिंचन विभाग (Irrigation Department) वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असतो. यंदा मात्र तो बिगर सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीत विक्रमी झेप घेतल्याच्या कारणावरून चर्चेत आला आहे. गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या ५१३.०१ कोटींच्या उद्दिष्टापैकी ५१२.४० कोटींची वसुली करीत इतर महामंडळांच्या तुलनेत कृष्णा खोरे विकास महामंडळ अव्वल ठरले आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आल्यानंतर कार्यकारी संचालकपदावर कायमस्वरूपी अधिकारी नसला, तरी मुख्य अभियंत्यांच्या आदेशानुसार सर्वच विभाग प्रमुखांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी पुरविले. त्याचबरोबर बिगरसिंचनासाठी राखीव असलेल्या पाण्याचे नियोजन करीत योग्य प्रमाणात संबंधित आस्थापनांना वितरितही केले.

ज्याप्रमाणे पाण्याचे वितरण केले. तसेच, काम पाणीपट्टी वसुलीतही केल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. २०२२-२३ चे पाणीपट्टी उद्दिष्ट मुदतीच्या आत पूर्ण करून इतर महामंडळांच्या तुलनेत आघाडी कायम ठेवली आहे.

गेल्या वर्षी ४०० कोटींची वसुली झाली होती. गेल्या २०१-२२ या वर्षीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये चांगलीच वाढ झाल्याचे समोर आले आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील कुकडीचा काही भाग सिंचनाखाली येतो. यापैकी सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या मंडळास ४३८.०१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यापैकी या मंडळांनी ४३४.८४ कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले, तर कुकडी व कडा या मंडळांना ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या मंडळांनी उदिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ७७.५६ कोटींची वसुली करण्यात यश मिळविले.

मागील वर्षी ४०० कोटींचे पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केल्याने यंदा ५१३.१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सर्वच विभागांनी बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
- हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT