Kisan Sabha Farmer March Agrowon
ताज्या बातम्या

Farmer March : 'शेतकऱ्यांपेक्षा मंत्र्यांना निवडणुका महत्त्वाच्या' ; किसान सभेचा मोर्चा निघणारच

Shetkari Morcha : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून निघणारा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा तीन दिवसांच्या पायी प्रवासानंतर मंत्री विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.

Team Agrowon

Kisan Sabha Farmer March : शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसदर्भात किसान सभेने (Kisan Sabha) अकोले ते लोणी पायी मोर्चाची (Farmer March) हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंगळवारी (ता.२५) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे किसान सभा आंदोलनावर ठाम आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात बुधवारी (ता. २६) अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघणार आहे. शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा पायी मोर्चा काढण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून निघणारा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा तीन दिवसांच्या पायी प्रवासानंतर मंत्री विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये शेतकरी कामगारांसह ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंतही सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या पायी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीसाठी किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, जे. पी. गावित, उमेश देशमुख, मेहबुब सय्यद, सदाशिव साळवे यांना आमंत्रिक करण्यात आले होते. तर राज्य सरकारतर्फे मंत्री विखे पाटील, महसूल सचिव व इतर संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. परंतु बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही.

शेतकरीप्रश्नांपेक्षा मंत्र्यांना निवडणुका महत्त्वाच्या -

किसान सभेच्या शिष्टमंडळाची महसूल मंत्र्यांसोबतची बैठक सुमारे तीन तास चालली. या बैठकीसाठी सरकराकडून फक्त महसूलमंत्री हजर होते. पंरतु बाकी कोणतेही मंत्री बैठकीसाठी हजर नव्हते.

बैठकीसाठी कृषीमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित खात्याचे इतर मंत्री हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना मतदार संघातील निवडणुका त्यांना महत्त्वाच्या वाटत आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकांसाठी कृषीमंत्री, आदिवासी विकास मंत्री निघून गेले. महसूल मंत्र्यांनी बैठक बोलावली, पण तेही शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविण्यासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसले. त्यामुळे किसान सभेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

असा असेल पायी मोर्चाचा प्रवास -

  • २६ एप्रिल - अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. संगमनेर (१२ किलोमीटर)

  • २७ एप्रिल सकाळी - रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ ते खतोडे लॉन्स (१० किलोमीटर)

  • २७ एप्रिल दुपारी - खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय, वडगाव पान (९.६ किलोमीटर)

  • २८ एप्रिल सकाळी - वडगाव पान ते समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी (११ किलोमीटर)

  • २८ एप्रिल दुपारी - समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी ते लोणी (१० किलोमीटर)

दरम्यान, गेल्याच महिन्यात नाशिकहून मुंबईच्या दिशेने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलम मागे घेण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT