Kharif Sowing
Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : सांगोल्यात ४० हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन

Team Agrowon

Sangola News : तालुक्यामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. तालुक्याचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे.

खरीप हंगामासंदर्भातील पेरणी, बियाणे व खतांचे संपूर्ण नियोजन कृषी विभागाने केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

तालुक्यात सध्या उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणाटणी कामांबरोबरच शेणखत विस्कटण्याची कामे सुरू आहेत. तालुक्यात सरासरी खरीप क्षेत्र २२ हजार ७१९ हेक्टर आहे. सन २०२१ खरीपमध्ये २९ हजार ८४८ हेक्टर क्षेत्रावर व गतवर्षी २०२२ मध्ये ३१ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

येणाऱ्या २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ४० हजार ३२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. तालुक्यासाठी यावर्षी खरिपासाठी १५ हजार ८२६ मे. टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले आहे.

या हंगामासाठी येणाऱ्या अडचणी व खतांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. गेल्या वर्षी युरिया खताचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला होता. यावर्षी खतांचे संपूर्णपणे सूक्ष्म नियोजन केले आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानदाराकडूनच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे. बॕगवरील किमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये.

बियाणे बॕग व लेबल जपून ठेवावे. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच बियाणांची पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यावरच म्हणजे ८०-१०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

खरीप हंगामातील पीकनिहाय पेरणीचे चित्र

पिकाचे

नाव सरासरी

हेक्टर क्षेत्र खरीप २०२२ चे क्षेत्र (हे.) २०२३ चे प्रस्ताविक क्षेत्र (हे)

बाजरी १५५९६.६ ११०१६.४ १५०००

मका ३९०१.६ १४२५६ १७५००

सूर्यफूल ३८३.८ ४०८० ४२५०

तूर २५७२.२ ९८३.१ १२५०

उडीद ९४ ४०३.९ ६००

मूग ८५.६ १९१.८ ४००

भुईमूग १५४.८ ४१२.७ ५००

सोयाबीन ०.६ २३०.८ ३००

कापूस ०.२ २६४.४ ४००

मटकी ० ११२.७ १२५

एकूण २२७१९.२ ३१९५२.८ ४०३२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT