Kharif Crop Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : खरीप गेलाच, आता रब्बीचाही वाटेना भरोसा

Rabi Season : खरिपाची पिके तर पावसाअभावी वाया गेलीच आहेत. आता रब्बीची पेरणी तोंडावर आली तरीही ढगाळ वातावरणापलिकडे कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही.

Team Agrowon

Solapur News : खरिपाची पिके तर पावसाअभावी वाया गेलीच आहेत. आता रब्बीची पेरणी तोंडावर आली तरीही ढगाळ वातावरणापलिकडे कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही.

यामुळे आगामी काळात वैरणीशिवाय जिल्ह्यातील पशुधन कसे वाचवावे याची चिंता बळीराजाला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.

सध्या जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. मुग, उडीद व सोयाबीन काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत असून सध्यस्थितीत पावसाची गरज आहे. पावसाचा ताण पडल्यामुळे फुलोरा व कळी गळून पडत आहेत. पावसाचा पडलेल्या खंडामुळे पीक वाढीवर व उत्पन्नावर दुष्परिणाम होत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ता. २६ जूनच्या शासननिर्णयानुसार २५ टक्के पीक विमा देण्यासाठी विमा क्षेत्रघटकातील रॅडम पद्धतीने निवडलेल्या १० गावातील अधिसूचित पिकांच्या महसूल मंडळ व तालुका एकूण पेरणी क्षेत्रांपैकी पाच टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्व्हे झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण ९१ महसूल मंडळापैकी ६६ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस न पडल्यामुळे ड्राय स्पेल लागू झालेला आहे.

मुग, उडीद व सोयाबिन ही पिके सध्या काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत असून पावसाअभावी पिके कोम्याजलेल्या स्थितीत आहेत. पावसाने ओढ दिल्याने फुलोरा व कळी गळून जात आहेत. मका, बाजरी, कडवळ ही वैरणीचे पिकेही सध्या पाऊस नसल्याने कोम्याजलेल्या स्थितीत आहेत. पावसाच्या ताणामुळे वाढीवर परिणाम होत आहे. फुटवे फुटण्यावर परिणाम झालेला आहे. तुरीची अवस्थाही अशीच आहे.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT