KDCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

KDCC Bank : कृषी पतपुरवठा उद्दिष्टपूर्तीनिमित्त ‘केडीसीसी’ बँकेचा गौरव

KDCC Bank Kolhapur : जिल्ह्याच्या वार्षिक कृषी पतपुरवठ्यात केडीसीसी बँकेचा वाटा तब्बल ७० टक्के आहे. पीक कर्जाच्या ३,२९८ कोटी पैकी २,२८६ कोटींचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला दिले आहे.

Team Agrowon

Kolhapur District Central Cooperative Bank : कोल्हापूर : जिल्ह्याच्या वार्षिक कृषी पतपुरवठ्यात केडीसीसी बँकेचा (KDCC bank) वाटा तब्बल ७० टक्के आहे. पीक कर्जाच्या ३,२९८ कोटी पैकी २,२८६ कोटींचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला दिले आहे.

गेल्या वर्षात बँकेने उद्दिष्टापेक्षाही पुढे जात ११७ टक्के कृषी पतपुरवठा केल्याबद्दल व इतर विभागांतील पतपुरवठ्याबद्दल जिल्हास्तरीय  बैठकीत बँकेला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे यांनी ही प्रशस्तीपत्रके स्वीकारली.

जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला संजयसिंह चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई
यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

गेल्यावर्षी म्हणजेच २०२२-२३ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १९५० कोटी रुपये पीक कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकेने उद्दिष्टाच्याही पुढे जात तब्बल २२८६ कोटी रुपये पीक कर्जपुरवठा करून ११७ टक्क्यांचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पार केले.

या यशस्वी उद्दिष्टपूर्तीवर ३३६ कोटी उद्दिष्ट वाढवून यावर्षी म्हणजेच २०२३-२४ मध्ये २२८६ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट दिले आहे.

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत वाढीव पीककर्ज निश्चिती केली आहे. त्यानुसार नियमित पीक कर्जाबरोबरच जादाचे म्हणून आडसालीसाठी रोपखरेदी व आंतर पिकासाठी हेक्टरी प्रत्येकी १८ हजार रुपये, पूर्वहंगामी व सुरू लागणीच्या रोप खरेदीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये, खोडवा पीक पाचट व्यवस्थापनासाठी हेक्टरी नऊ हजार रुपये, खरिपातील सुधारित वाणांच्या भात पीक बीजोत्पादनासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अशी वाढ केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT