Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Procurement : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीला कळवण बाजार समितीचा विरोध

Onion Market : हा ठराव शासनाला सादर करण्याची सूचना देखील सभेत करण्यात आली. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लावलेले वाढीव ४० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी संचालक योगेश महाजन, योगेश शिंदे यांनी या वेळी केली.

Team Agrowon

Nashik News : लोकनेते ए. टी. पवार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ‘नाफेड, एनसीसीएफ’मार्फत कांदा खरेदी करण्यात येऊ नये तसेच थेट पणन परवाने, खासगी बाजार समिती, थेट खरेदी केंद्र यांना परवानगी देण्यात येऊ नये, असा महत्त्वपूर्ण ठराव बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती धनंजय पवार होते. व्यासपीठावर कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, काँग्रेसचे प्रदेश सचिव यशवंत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कमको अध्यक्ष योगेश महाजन, कांदा व्यापारी योगेश शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख संभाजी पवार, उपसभापती दत्तू गायकवाड, राजेंद्र आहेर, विष्णू बोरसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हा ठराव शासनाला सादर करण्याची सूचना देखील सभेत करण्यात आली. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लावलेले वाढीव ४० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी संचालक योगेश महाजन, योगेश शिंदे यांनी या वेळी केली. बाजार समितीला आर्थिक वर्षात ४१ लाख ९६ हजार रुपये नफा झाला असून, विद्यमान संचालक मंडळाने सुरू केलेल्या कामकाजात खर्चात काटकसर केली.

सचिव रवींद्र हिरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून आर्थिक वर्षाचा अहवाल वाचन केले. आर्थिक पत्रकाबाबत विचार विनिमय करण्यात येऊन नाकोडा, कनाशी, उपआवारातील कामकाज, विविध विकास बांधकाम यांना मंजुरी घेण्यात आली.

या वेळी संचालक सोमनाथ पवार, बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरनार, शशिकांत पवार, प्रवीण देशमुख, दिलीप कुवर, पंढरीनाथ बागूल, प्रवीण देशमुख, शीतलकुमार अहिरे, भरत पाटील, सुनीता जाधव, रेखा गायकवाड, बाळासाहेब वराडे, गंगाधर खांडवी, भूषण बच्छाव, दत्तू गांगुर्डे, जिभाऊ वाघ आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

Girna Dam Water Storage : गिरणा धरणातील जलसाठा वाढतोय

Pandharpur Flood : पंढरपुरातील पुराचा धोका टळला

Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; हळदीत चढउतार, केळीला श्रावणाचा उठाव, आले दरात सुधारणा, मका स्थिरावलेला

SCROLL FOR NEXT