Bharat Jodo Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी ‘भारत जोडो’

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा मंगळवारी (ता. ८) महाराष्ट्रात पहिला दिवस होता. सकाळी नऊ वाजता हजारोंच्या उपस्थितीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी तालुक्यातील वन्नळी येथून गुरुद्वारापासून चालायला सुरुवात केली.

Team Agrowon

नांदेड : राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा (Bharat Jodo Yatra) मंगळवारी (ता. ८) महाराष्ट्रात पहिला दिवस होता. सकाळी नऊ वाजता हजारोंच्या उपस्थितीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी तालुक्यातील वन्नळी येथून गुरुद्वारापासून चालायला सुरुवात केली. हातात काँग्रेसचे झेंडे, अंगात पांढरे टी शर्ट घालून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक यांनी यात्रेत सहभाग घेतला. ‘द्वेषााला प्रेमाने उत्तर देण्यासाठी आम्ही आलोत,’’ असे पदयात्रेत सहभागी झालले नागरिक सांगत होते.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच‌ वयोगटातील महिला पुरुष यात सहभागी झाले आहेत. कार्यकर्ते, नागरिकांनी सकाळी सातपासूनच जमायला सुरुवात केली होती. वातावरण निर्मितीसाठी शाहिरी पथक क्रांतिगीतांचे गायन करत होते.‌ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही सकाळी गीतगायनात भाग घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. दुपारच्या विश्रांती स्थळीही उत्साह दिसून आला. विश्रांती घेऊन दुपारी तीन-साडेतीन वाजता यात्रेकरू पुन्हा चालायला लागले.

राहुल गांधी यांच्या अगोदर कॉंग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते यात्रेच्या ठिकाणी

सकाळी ८.१७ वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यात्रा ठिकाणी

८.३० वाजता दिग्विजय सिंह व जयराम रमेश यात्रा स्थळी

८.३८ कन्हैया कुमार यांचे आगमन

योगेंद्र यादव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग

के. के. पांडे यांचे निधन

‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी के. के. पांडे (वय ८०) यांचे देगलूर इथे निधन झाले. वझरगा येथे त्यांच्या पार्थिवावर पुष्पगुच्छ अर्पन करून राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह आदी नेते उपस्थित होते. पांडे यांचे पार्थिव पाहून राष्टीय सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Manikrao Khule: परतीचा माॅन्सून पाऊस देईल का?

AI Technology: ‘साब, मेरी तो जिंदगी बदल जायेगी!’

Rose Crop Pest: गुलाबावर ब्लॅक वाइन थ्रीप्सची नोंद

Women Entrepreneurship: पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची दुनिया

Modern Rice Farming: अमेरिकेतील आधुनिक भात शेती

SCROLL FOR NEXT