Jayant Patil Agrowon
ताज्या बातम्या

Jayant Patil : गर्दी जमविण्यासाठी रेशन कार्ड रद्द करण्याची धमकी देणे हुकूमशाही

Shasan Aplya Dari : जळगाव येथील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात न येणाऱ्या नागरिकांना रेशन कार्ड रद्द करण्याची धमकी दिली जात आहे.

Team Agrowon

Mumbai News : जळगाव येथील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात न येणाऱ्या नागरिकांना रेशन कार्ड रद्द करण्याची धमकी दिली जात आहे. ही राज्य सरकारची हुकूमशाही आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी (ता. २७) दिला. ही हुकूमशाही असून, अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘मुख्यमंत्री महोदय, हे काय सुरू आहे?’ असा सवालही पाटील यांनी विचारला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात असल्याचे समोर आल्याचा उल्लेख पाटील यांनी सोशल मीडियावर करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

जळगाव महापालिकेने लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी यावे, अन्यथा पुढील चार महिने रेशन बंद करण्यात येईल, अशा आशयाचे संदेश पाठविले होते. त्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे.

याप्रकरणी दिलेले आदेश मागे घेण्यात येतील असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले असले, तरी हे संदेश व्हायरल झाल्याने राज्य सरकारसह सरकारी यंत्रणेला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.

पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार असून, या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी यासाठी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे.

रेशन कार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांचे रेशन कार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा धमकीवजा संदेश पसरविण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT