Jayant Patil Agrowon
ताज्या बातम्या

Jayant Patil : ‘दुष्काळ आपल्या दारी’ आल्याची जाणीव आहे का? ; जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Drought Condition : सद्य:स्थितीत राज्यात ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Team Agrowon

Jayant Patil Criticize on Government : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव तरी आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील संभाव्य दुष्काळ स्थितीवरून सत्ताधाऱ्यांना सोशल मीडियावरून धारेवर धरले.

ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. ‘सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता १८ जिल्ह्यांतील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jeevan Mission : वीज जोडणीअभावी रखडले जलजीवन मिशन योजनेचे काम

Sugarcane Damage : आडव्या उसासाठी हवी मदत

Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer Relief : आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत करा

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

SCROLL FOR NEXT