Jayakwadi Dam  Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

अलीकडच्या तीन-चार दिवसांत नगर, नाशिक भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडीतील पाणीसाठा (Jayakwadi Dam) झपाट्याने वाढतो आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील (Jayakwadi Dam) उपयुक्त पाणीसाठा शुक्रवारी (ता. १५) दुपारी २ वाजता ५९.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गोदावरी (Godavari River) नदीपात्रातून प्रकल्पात सातत्याने आवक सुरूच आहे.

अलीकडच्या तीन-चार दिवसांत नगर, नाशिक भागातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडीतील पाणीसाठा (Jayakwadi Dam) झपाट्याने वाढतो आहे. १० जुलैअखेर जायकवाडीतील उपयुक्त पाण्यासाठी केवळ ३४ टक्क्यांवर होता. त्या तुलनेत जवळपास २६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गुरुवारी (ता. १४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास जायकवाडीत ४२ हजार २२३ क्युसेकने आवक सुरू होती. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही आवक ६२ हजार २२० क्युसेकवर, तर गुरुवारी रात्री १० वाजता घटून ३३२९४ क्युसेकवर आली होती.

शुक्रवारी (ता. १५) सकाळी ६ वाजता आवकेत पुन्हा वाढ होऊन ती ४७ हजार ९७० क्युसेकवर, तर दुपारी दोन वाजता ५१ हजार १११ क्युसेकवर पोहोचली होती. होत असलेली आवक पाहता पाऊस थांबला तरी घटत गेली तरी चार ते पाच दिवस आणखी ही आवक सुरूच राहणार आहे. दुसरीकडे नगर, नाशिक भागांसह प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पाऊस झाल्यास आवकेत वाढ होणार हेही स्पष्टच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT