Flower Farming Agrowon
ताज्या बातम्या

Floriculture : जानोरीच्या फुलशेतीची मलेशियातील पर्यटकांना भुरळ

गेल्या २० वर्षांत विविध प्रकारच्या फुलशेतीचा विस्तार झाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीसह, बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक आव्हाने येथील शेतकरी पेलत आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसराने फुलशेतीत (Flower Farming) ओळख निर्माण केली आहे. गेल्या २० वर्षांत विविध प्रकारच्या फुलशेतीचा विस्तार झाला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीसह, बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक आव्हाने येथील शेतकरी पेलत आहेत.

असे असतानाही येथील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जिवंत ठेवली आहे. म्हणूनच अनेक शेतकरी व पर्यटक या भागात भेटी देत असतात.

मलेशिया येथील कृषी अभ्यासक व पर्यटकांनी या परिसरात भेटी देत संरक्षित शेतीमधील फुलउत्पादनाची पाहणी करून कामकाज समजून घेतले. या भेटीत येथील रंगीबेरंगी फुले पाहून या पर्यटकांना भुरळ पडली होती.

जानोरीचे प्रगतिशील फुल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर डवणे पाटील यांची गुलाबशेती तर दत्तात्रय घुमरे यांच्या पॉलिहाऊसमध्ये केलेल्या शेवंतीच्या फुलांची शेती व जीप्सो विविध फिलर्सची पाहणी मलेशियामधील अभ्यासक, पर्यटकांनी केली. फुलशेतीतील पीक व्यवस्थापन, काढणीपश्चात हाताळणी प्रतवारी व फुलांची गुणवत्ता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे पाहुणचार

मलेशियातील कृषी अभ्यासक व पर्यटकांनी येथील फुलशेतीची पाहणी करतेवेळी संदीप बाळासाहेब घुमरे व अरुण घुमरे, विजय घुमरे आदींनी परदेशी पाहुण्यांना फुलशेतीची माहिती दिली.

डवणे परिवार व घुमरे परिवाराने ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीनुसार शाल, टोपी व फुलांचा गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT