Jaljeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’मधील खाबूगिरीला ॲप लावणार चाप

Latest Agriculture Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम हाती घेतला आहे.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेतून ९८९ कामे होणार असून त्यासाठी सुमारे आठशे कोटींहून अधिक निधी येणार आहे.

जलजीवन मिशनमधील निविदा प्रक्रिया, कामांची गुणवत्ता, ग्रामस्थांना विश्‍वासात न घेणे अशा अनेक तक्रारी सुरुवातीच्या टप्प्यात होत्या. जलजीवन मिशनमधील खाबूगिरी रोखण्यासाठी व योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने ‘जलजीवन मिशन क्वालिटी मॉनेटरिंग सिस्टिम’ नावाचे ॲप विकसित केले आहे.

काम मंजूर झालेल्या गावामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून काम पाहणाऱ्या कंपनीने दिलेल्या भेटी, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या भेटी व केलेली पाहणी याची माहिती आता जिओ टॅगिंग फोटो व व्हिडिओसह या ॲपवर द्यावी लागणार आहे.

जलजीवन मिशनमध्ये थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून काम पाहणाऱ्या संस्थांकडून देखील या ॲपवर माहिती घेतली जाणार आहे. कामाच्या ठिकाणी दिलेल्या भेटीत काय आढळले याचा अभिप्रायदेखील द्यावा लागणार आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामाचे देयक अदा करण्यासाठी मुख्य वित्त व लेखाधिकारी यांच्याकडे या कामाची ही माहिती ॲपद्वारेच सादर केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र लॉगिन देण्यात आल्याने या कामावर त्यांचे नियंत्रण राहणार आहे.

प्रामाणिक ठेकेदारांसाठी उपयुक्त

एखाद्या ठिकाणी ठेकेदाराला काम मिळते, परंतु अनेक अडचणी येतात. त्यामुळे ठेकेदारांना त्यांचे काम वेळेत पूर्ण करता येत नाही, परिणामी त्यांना दंड भरावा लागतो. या प्रक्रियेत ठेकेदारांना त्यांची बाजू वेळेत मांडण्यासाठीही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रामाणिक ठेकेदारांना सहन करावा लागणारा नाहक भुर्दंड व कारवाई, बदनामी यापासून दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यास आमचे प्राधान्य आहे. या योजनेबद्दल पारदर्शकता तसेच कामांमध्ये गुणवत्ता असावी व कामे वेळेत पूर्ण व्हावीत या प्रमुख उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापू्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Papaya Crop: पपई पिकाला यंदा जेमतेम फळधारणा

Micro Irrigation: ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेतून अनुदान

Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर

Rabbi Anudan GR: कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार

Soybean MSP: उपबाजारपेठ तिर्थपुरीत शनिवारपासून सुरू होणार सोयाबीन हमीभाव केंद्र

SCROLL FOR NEXT