Mango Production Agrowon
ताज्या बातम्या

Mango Production : आंब्यांना मोहोर येण्यास अजून पंधरवडा लागणार

अवकाळी पाऊस आणि थंडी कमी झाल्यामुळे आंबा कलमांना आलेली पालवी अजूनही जून झालेली नाही. पालवीला मोहोर येण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः अवकाळी पाऊस (Untimely Rain) आणि थंडी (Cold Weather) कमी झाल्यामुळे आंबा कलमांना (Mango Graft) आलेली पालवी अजूनही जून झालेली नाही. पालवीला मोहोर (Mango Bloom) येण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे.

गेले दोन ते तिन दिवस हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविलेली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. ६) रात्री हलका पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर हवेत उष्मा होता. मागील आठवडाभरात थंडी गायब झाली आहे.

सलग ढगाळ वातावरणामुळे आंबा कलमांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यापासून पालवी आणि मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागली. मंगळवारी पडलेल्या पावसामुळे पालवी फुटलेल्या कलमांनाही पालवी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जून झालेल्या पालवीला मोहोर येण्यासाठी अजून १५ ते २० दिवस लागतील. किडीपासून मोहोर वाचविण्यासाठी औषध फवारणीचा पर्याय अवलंबावा लागत आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढलेला आहे. अपेक्षित उत्पादन हाती कधी लागणार, या बाबत बागायदारांमध्येच संभ्रम आहे.

सध्याचे वातावरण आंबा बागांना पोषक नाही. मोठ्या प्रमाणात झाडांना पालवी आलेली आहे; मात्र मतलई वारा नाही. थंडी नाही. त्यामुळे झाडे मोहोरलेली नाहीत. सध्या पडणारा अवकाळी पाऊस हा पर्यावरणातील बदलाचा परिणाम आहे.
देवेंद्र झापडेकर, आंबा बागायतदार, रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT